Aishwarya Rai : ‘पनामा पेपर्स’ प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या रायची ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिची अंमलबजावनी संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी पार पडली. सोमवारी सकाळी सुरु झालेली ही चौकशी संध्याकाळी 7 च्या सुमारास संपली.

Aishwarya Rai : पनामा पेपर्स प्रकरणात अभिनेत्री ऐश्वर्या रायची ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?
ऐश्वर्या राय
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 7:47 PM

नवी दिल्ली : ‘पनामा पेपर्स लीक’ (Panama Papers leak case) प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) हिची अंमलबजावनी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून तब्बल 6 तास चौकशी पार पडली. सोमवारी सकाळी सुरु झालेली ही चौकशी संध्याकाळी 7 च्या सुमारास संपली. यावेळी माध्यमांशी ऐश्वर्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीने माध्यमांशी बोलणं टाळलं.

पनामा पेपर्स लीक प्रकरणात ऐश्वर्या राय-बच्चन ला यापूर्वी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोन तीन वेळ मागून घेतला होता. पुढे दुसरं समन्स बजावण्यात आल्यानंतर ऐश्वर्याला चौकशीसाठी हजर राहिली. यावेळी पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.

पनमा पेपर्स लीक प्रकरणात कुणाची नावे?

या प्रकरणात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अदानी यांच्या ज्येष्ठ बंधूंचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात बच्चन कुटुंबियांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सध्या ईडीकडून केली जात आहे.

पनामा पेपर्स लीक प्रकरण नेमकं काय?

पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.

अभिषेक बच्चनचीही चौकशी

पनामा पेपर्स प्रकरणाचा तपास बराच काळ सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार आहे.

इतर बातम्या :

R Madhavan In Dubai : आर. माधवन पत्नीसह दुबईत शिफ्ट, मुलगा वेदांतच्या करिअरसाठी घेतला निर्णय

Alia Bhatt | ‘सोने दी कुडी…’, आलिया भट्टच्या सोनेरी लेहेंग्यावर खिळली नजर, जाणून घ्या या लूकची खासियत!