
Aishwarya Rai Bachchan – Salman Khan: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री सलमान खान ब्रेकअपनंतर दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहे. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. ‘हम दिल जे चुके सनम’ सिनेमातून दोघे चाहत्यांच्या पहिल्यांदा भेटीला आले आणि त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमानंतरच दोघांमध्ये प्रेम बहरलं. दरम्यान, सिनेमात ऐश्वर्या हिच्या आईची भूमिका साकारणाऱ्या स्मिता जयकर यांनी दोघांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं… असं वक्तव्य ऐश्वर्याची ऑनस्क्रिन आई स्मिता जयकर यांनी केलं आहे.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री फक्त ‘हम दिल दे चुके’ सनम सिनेमापर्यंत मर्यादित नव्हती याचा अंदाज चाहत्यांना देखील आला होता. सिनेमात दोघांवर चित्रित केलेले असे अनेक सीन आहेत जे आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्री स्मिता जयकर दोघांच्या नात्याबद्दल म्हणाल्या, ‘सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम बहरलं. त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. ज्यामुळे सिनेमासाठी देखील मोठी मदत झाली. सिनेमातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.’ सांगायचं झालं तर, सिनेमाला 26 वर्ष पूर्ण झाली आहेत.
18 जून 2025 रोजी सिनेमाला 26 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनीही सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. मुलाखतीत, भन्साळी यांनी पुष्टी केली की दोघांमध्ये खरोखरच प्रेम फुलत होतं आणि या केमिस्ट्रीने शूटला आणखी जादुई बनवलं होतं.
सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्याच्या आधी सलमान खान अभिनेत्री सोमी अली हिला डेट करत होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सोमी हिने देखील सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केलं. दरम्यान, ऐश्वर्याची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर सलमान खान याने सोमीसोबत ब्रेकअप केलं.
पण सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे देखील प्रेमसंबंध फार काळ टिकले नाहीत. ऐश्वर्याने सलमान याच्यावर शारीरिक आणि मानसिक आरोप केले. जवळपास 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अनेक सलमान खान याने सर्वांसमोर ऐश्वर्यासाठी असलेलं प्रेम देखील व्यक्त केलं आहे. आज दोघे त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.