
Aishwarya Rai Bachchan with Daughter: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रत्येक वर्षी जीएसबी गणपती मंडळात दर्शनासाठी जात असते. यंदाच्या वर्षी देखील ऐश्वर्या लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत जीएसबी गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्या यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावेळी आराध्या हिला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. आराध्या आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र आराध्या हिची चर्चा सुरु आहे.
व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांच्या गर्दीतून जात आहेत. मंडळामध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोघी चाहत्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी देखील थांबल्या.. ऐश्वर्या आणि आराध्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली…
आराध्या आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आराध्या हिला काय झालं आहे. अशी विचित्र का दिसत आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आई आणि मुलीने दोघींनी हेअर स्टाईल बदला…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आराध्या आईसारखी दिसत नाही…’ सध्या सर्वत्र आराध्या आणि ऐश्वर्या यांची चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण काही दिवसांपूर्वी दोघे एकत्र दिसले आणि घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला. अमिताभ बच्चनसोबत आराध्याच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमात देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. याशिवाय ऐश्वर्याने अभिषेकला त्याच्या 49 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 2011 मध्ये दोघांनी लेक आराध्या बच्चन हिचं जगात स्वागत केलं.