दोन सेकंदामुळे ऐश्वर्या रायच्या खासगी आयुष्यात वादळ आलेलं, प्रकरण कायदेशीर नोटीसपर्यंतही पोहोचलं

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या हे कायमच चर्चेत असणारे नाव असून तिच्या खासगी आयुष्यावरही चाहत्यांच्या नजरा असतात. मोठा काळ ऐश्वर्याने चित्रपटांमध्ये गाजवलाय.

दोन सेकंदामुळे ऐश्वर्या रायच्या खासगी आयुष्यात वादळ आलेलं, प्रकरण कायदेशीर नोटीसपर्यंतही पोहोचलं
| Updated on: Jul 28, 2025 | 5:43 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. ऐश्वर्याने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली असून तिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. मागील काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या अभिषेकपासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, यावर ना ऐश्वर्या ना बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सलमान खानला डेट करत होती.

ऐश्वर्या रायच्या खासगी आयुष्यात मोठ्या समस्या 

ऐश्वर्या राय हिचे चित्रपट धमाका करतात. मात्र, एका चित्रपटामुळे ऐश्वर्याच्या आयुष्यात खूप मोठी समस्या निर्माण झाली होती. हेच नाही तर तिला अनेक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. एक किस तिला खूप जास्त महागात पडली होती. आपल्यासोबत हे नेमके काय सुरू आहे ऐश्वर्या देखील कळत नव्हते. हृतिक रोशनसोबत ऐश्वर्याने धूम 2 मध्ये काम केले होते. 

त्या किसबद्दल स्पष्ट बोलली अभिनेत्री 

या चित्रपटात तिचा आणि हृतिक रोशनचा एक किसचा सीन होता. जो तूफान वादात सापडला. किसचा सीन जरी चित्रपटात असला तरीही तिच्या खऱ्या आयुष्यात समस्या वाढल्या. या लिपलॉकमुळे तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप तणावाातून जावे लागले. एका मुलाखतीत याबद्दल ऐश्वर्याने खुलासा देखील केला आणि आपल्यासोबत नेमके काय घडत होते, हे तिने सांगितले. 

देशभरातून लोकांनी पाठवल्या कायदेशीर नोटीस

ऐश्वर्या राय म्हणाली की, मी धूम चित्रपटात एक किसचा सीन केला होता. ज्याची खूप म्हणजे खूप जास्त चर्चा रंगली. मी हैराण होते. मला देशभरातून लोकांनी कायदेशीर नोटीस पाठवल्या. मी फक्त एक अभिनेत्री आहे आणि माझं काम केले. दोन सेकंदांच्या त्या किसच्या सीनमुळे लोकांनी मला जबाब मागितले. ऐश्वर्या राय ही कायमच आपल्या मुलीसोबत विदेशात जाताना दिसते. मुलीला शाळा सोडून नेहमीच विदेशात घेऊन जात असल्याने मध्यंतरी ऐश्वर्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली होती.