AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 कोटींचा तो चित्रपट ज्यामध्ये अभिनेत्रीने घातले तब्बल 200 किलो सोन्याचे दागिने; तिच्या सुरक्षेसाठी होते 50 बॉडीगार्ड

चित्रपट उत्कृष्ट बनवण्यासाठी निर्माते कोट्यवधी रुपये खर्च करतात. केवळ सेटवरच नाही तर कपडे आणि दागिन्यांवरही खूप पैसा खर्च केला जातो. असा एक चित्रपट ज्याच प्रसिद्ध अभिनेत्रीने तब्बल 200 किलो सोन्याचे दागिने घातले होते.

100 कोटींचा तो चित्रपट ज्यामध्ये अभिनेत्रीने घातले तब्बल 200 किलो सोन्याचे दागिने; तिच्या सुरक्षेसाठी होते 50 बॉडीगार्ड
Aishwarya Rai Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2025 | 1:32 PM
Share

आपण अनेकदा ऐकतो की एखादा चित्रपट कोट्यवधींच्या बजेटमध्ये बनवला जातो. यामध्ये फक्त सेट किंवा वेगवेगळ्या ठिकाणांचा खर्चच समाविष्ट नसतो तर प्रत्येक दृश्य उत्कृष्ट बनवण्यासाठी पैसे खर्च केले जातात. जेव्हा एक दर्जेदार चित्रपटाचा विचार केला जातो तेव्हा निर्मात्यांनी प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असते. जेणेकरून लोकांना चित्रपटात काही कमी आहे असं वाटणार नाही.

या अभिनेत्रीने चक्क 200 किलो सोन्याचे दागिने घातले होते

बऱ्याचदा लोक दीपिका पदुकोणच्या ‘रामलीला’ चित्रपटाबद्दल बोलतात. कारण ज्यामध्ये तिने 30 किलो वजनाचा लेहेंगा घातला होता. ‘पद्मावत’ मधील ‘घूमर’ गाण्यासाठी तिने एक जड लेहेंगा देखील घातला होता. दागिन्यांसह लेहेंग्याचे एकूण वजन 30 किलो होते. पण तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल आणि चित्रपटाबद्दल माहिती आहे का? ज्यामध्ये या अभिनेत्रीने चक्क 200 किलो सोन्याचे दागिने घातले होते. सुरक्षेसाठी तब्बल 50 बॉडीगार्ड तैनात होते.

चित्रपटाने जगभरात 106.68 कोटींचा व्यवसाय केला

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन. 2008 मध्ये तिचा एक चित्रपट आला होता. 3 तास ​​33 मिनिटांच्या या चित्रपटात तिच्यासोबत हृतिक रोशन आहे. या चित्रपटाने जगभरात 106.68 कोटींचा व्यवसाय केला. भारतात त्याचे निव्वळ कलेक्शन 55.91 कोटी कमाई केली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बऱ्यापैकी चालला.

दागिने एकूण 70 कारागिरांनी तयार केले होते

45 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘जोधा अकबर’ चित्रपटात ऐश्वर्या रायने महाराणी जोधाची भूमिका साकारली होती. त्यासाठी तिने बनावट नाही तर खरे सोन्याचे दागिने घातले होते. वृत्तानुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्रीने 200 किलो सोन्याचे दागिने घातले होते. ऐश्वर्या रायचे दागिने एकूण 70 कारागिरांनी तयार केले होते. त्यात सोन्यासोबतच मोती आणि इतर मौल्यवान धातूंचाही वापर करण्यात आला होता. चित्रपटात महाराणी जोधाबाई बनण्यासाठी ऐश्वर्याचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला होता.

50 बॉडीगार्ड कायम सोबत असायचे

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऐश्वर्या रायच्या दागिन्यांची खूप प्रशंसा झाली. त्याच डिझाइनचे दागिनेही बाजारात आले. पण विशेष म्हणजे जेव्हा ऐश्वर्या 200 किलो सोन्याचे दागिने घालायची तेव्हा तिच्या सुरक्षेसाठी 50 सुरक्षा रक्षक होते जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तिला धोका होऊ नये.

या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत हृतिक रोशन देखील मुख्य भूमिकेत होता. इला अरुण, सोनू सूद, पूनम सिन्हा यांनीही या चित्रपटात काम केले होते. जगभरात 100 कोटींचा व्यवसाय करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.