
‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये दिसणार आहे. अजय देवगण, रवि किशन, मृणाल ठाकूर आणि विंदू दारा सिंग येत्या एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. नुकताच या शोचा टीझर शेअर करण्यात झाला आहे. त्यामध्ये एक अभिनेता दररोज झोपण्यापूर्वी पत्नीच्या पायापडून झोपत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा अभिनेता कोण जाणून घ्या…
प्रोमोमध्ये अजय देवगणने आपल्या विनोदी टिप्पण्यांनी आणि मजेदार वन-लाइनर्सने सर्वांना हसवल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये कपिल शर्माने रवि किशनबद्दल बोलताना म्हटलं, “मी ऐकलं आहे की रवि भाई झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या पायाला पडतात.” ते ऐकून मृणाल ठाकूर आणि प्रेक्षक चकीत झाले.
रवि किशन काही बोलण्यापूर्वीच अजय देवगणने उत्तर दिलं, “जितका पापी (गुन्हेगार) माणूस असतो, तितकाच तो आपल्या पत्नीच्या पाया पडतो.” पुढे तो म्हणाला, “नेत्याच्या हातात माइक देऊ नये. तू त्याच्या तोंडाजवळ थेट माइक धरलास.” नेत्यांबद्दल बोलताना अजयने नवजोत सिंग सिद्धू यांच्यावरही जोक केला आणि म्हणाला, “सिद्धू पाजींनी क्रिकेटमध्ये एक रुमाल टाकला, राजकारणात एक रुमाल आणि इथे तर पूर्ण चादर आहे.”
अजय देवगनने उडवली कपिल शर्माची खिल्ली
अजय देवगणने कपिल शर्माच्या वजन कमी करण्यावरही टिप्पणी केली, “लोक वजन कमी करतात. तू तर इतकं कमी केलंस की तुझ्या नाकाचंही वजन कमी झालं आहे.” यावर कपिलने उत्तर दिलं, “अजय सर आज फ्रंट फूटवर खेळत आहेत.” दुसऱ्या एका टीझर व्हिडीओमध्येही अजय देवगन कपिल शर्माची खिल्ली उडवताना दिसले.
‘सन ऑफ सरदार २’ रिलीज डेट
‘सन ऑफ सरदार २’ ही अजय देवगणच्या २०१२ मधील हिट चित्रपट ‘सन ऑफ सरदार’चा सिक्वेल आहे. पहिल्या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य अभिनेत्री होती. सिक्वेलमध्ये अजय देवगण जसविंदर ‘जस्सी’ सिंग रंधावा याच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणसोबत मृणाल ठाकूर, रवि किशन, संजय मिश्रा आणि रोशनी वालिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.