AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड दमडीचा अभिनेता, तुला मराठी किती येतं? इंग्रजीमध्ये शिकलास…; रितेश देशमुखवर बिग बॉस फेम रिलस्टारची टीका

अभिनेता रितेश देशमुखवर बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेला रिलस्टार पुनीतने निशाणा साधला आहे.

दीड दमडीचा अभिनेता, तुला मराठी किती येतं? इंग्रजीमध्ये शिकलास...; रितेश देशमुखवर बिग बॉस फेम रिलस्टारची टीका
Riteish DeshmukhImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 17, 2025 | 1:24 PM
Share

मराठी भाषेवरून सध्या महाराष्ट्रात तीव्र चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. या मुद्द्याने राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. काही मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील एका हॉटेल मालकाला मराठी येत नसल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तो एका व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगताना दिसतो. याच व्हिडीओवर रील्स स्टार पुनीत सुपरस्टारने रितेश देशमुखवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाला बिग बॉस फेम रिलस्टार?

पुनीत सुपरस्टार त्याच्या विचित्र आणि आगळ्यावेगळ्या व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी तो रस्त्यावरील घाणेरड्या पाण्यात लोळताना दिसतो, तर कधी स्वतःवर काहीतरी ओतताना दिसतो. अशातच त्याने सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये रितेश एका पापाराझी व्यक्तीशी बोलताना दिसतो, ज्याला तो विचारतो, “मराठी की हिंदी? दोन्ही येतात?” त्यावर समोरची व्यक्ती हसत “हा हा” असं उत्तर देते. यावर प्रतिक्रिया देताना पुनीत म्हणतो, “हा दीड दमडीचा अभिनेता रितेश देशमुख, आता म्हातारा होत चालला आहे. पत्रकार त्याला प्रश्न विचारतात, तेव्हा तो म्हणतो, हिंदीत बोलायचं की मराठीत? आणि जेव्हा तो हिंदीत बोलतो, तेव्हा रितेश त्याला नकार देतो.”

वाचा: संजय दत्तने सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट झाले नसते; उज्ज्वल निकम यांचा धक्कादायक दावा

पुनीत पुढे म्हणतो, “तू मला एक सांग, तुझ्या हिंदुस्तानात आणि मुंबईत कोट्यवधी लोक आहेत, जे मराठी नाहीत. त्यात तुला बंगाली, मुस्लिम, गुजराती, बिहारी असे सगळे भेटतील. तू हिंदी भाषेचा अपमान का करतोस? तू मराठी भाषेचं समर्थन करतोस, हे ठीक आहे. आम्हीही मराठीला पाठिंबा देतो. पण कोणी तुझ्याशी हिंदीत बोलत असेल, तर त्याचा अपमान करण्याचा तुला अधिकार कोणी दिला? आणि तुला स्वतःला तरी मराठी किती येतं? तू स्वतः इंग्रजी शाळेत शिकला आहेस आणि तुझं लग्न ख्रिश्चन महिलेशी झालंय.”

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

पुनीतच्या या व्हिडrओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कमेंट्समध्ये लिहिलं, “तुझ्या कानशिलात लगावणारे बरोबर आहेत,” तर काहींनी म्हटलं, “आता तुझं काय होणार, कारण मी बऱ्याच दिवसांपासून तुझा खेळ बंद करण्याच्या मागे होतो.” अनेकांनी पुनीत कायमच वायफळ बडबड करत असतो असेही म्हटले आहे.

कोण आहे पुनीत

पुनीत सुपरस्टार हा एक रिलस्टार आहे. त्याचे रिल्स हे कायमच विचित्र असतात. तो ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही सहभागी झाला होता, पण पहिल्याच दिवशी त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले. पुनीतचा रितेश देशमुखवर टीका करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर आता त्याने तो काढून टाकला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.