Ajith Kumar | साऊथ सुपरस्टार अजितकुमारला पितृशोक; अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट

अजित आणि त्यांचे दोन बंधु अनुप कुमार आणि अनिल कुमार यांनी मिळून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्याचसोबत अशा कठीण काळात आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना केली आहे.

Ajith Kumar | साऊथ सुपरस्टार अजितकुमारला पितृशोक; अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट
Ajith KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 1:31 PM

चेन्नई : तमिळ सुपरस्टार अजितकुमारचे वडील पी. सुब्रमण्यम यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. अजितकुमारच्या वडिलांचं निधन वृद्धापकाळाच्या समस्यांमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईमधील बेसेंट नागा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अजितकुमारने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. या पोस्टवर कमेंट करत सर्वसामान्यांसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. ‘अजितकुमार आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करते. पी. सुब्रमण्यम यांच्या आत्म्याला शांती लाभो’, असं अभिनेत्री साक्षी अग्रवालने लिहिलंय. तर असंख्य चाहत्यांनीही कमेंट करत शोक व्यक्त केला.

अजित आणि त्यांचे दोन बंधु अनुप कुमार आणि अनिल कुमार यांनी मिळून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्याचसोबत अशा कठीण काळात आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना केली आहे. ‘आमचे वडील पी. एस. मणी यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना आणि आमच्या कुटुंबाला वैद्यकीय मदत पुरवलेल्यांचे आम्ही आभारी आहोत. चार वर्षांपूर्वी त्यांना आलेल्या स्ट्रोकनंतर खूप काळजी घेतली गेली’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.

हे सुद्धा वाचा

तुमच्याकडून येणाऱ्या सांत्वन आणि शोकसंदेशांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. मात्र काही वेळेपुरतं आम्हाला कोणाचेही कॉल घेण्यास किंवा संदेशांना प्रतिसाद देण्यास शक्य होणार नाही. त्यामुळे आम्हाला समजून घेण्याची विनंती करतो, असं त्यांनी या पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलंय.

अजितकुमारचे वडील पी. सुब्रमण्यम हे केरळमधील मल्याळी भाषिक होते. त्यांनी कोलकाताच्या सिंधी मोहिनीशी लग्न केलं होतं. 1971 मध्ये अजितकुमारचा जन्म झाला. अजितकुमार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असले तरी त्यांचे दोन्ही भाऊ इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. अनुप कुमार हे गुंतवणूकदार आहेत. तर अनिल कुमार हे आयआयटी मद्रासमधून शिकल्यानंतर व्यावसायिक म्हणून काम करू लागले.

अजितकुमारला चाहते एके म्हणूनही ओळखतात. तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील तो खूप मोठा स्टार आहे. गेल्या 25 वर्षांत त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.