AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमारचं या अभिनेत्रीसोबत अफेअर, समजताच ट्विंकल खन्नाने सोडलेलं घर, अक्षयने अर्धवट सोडलेला चित्रपट

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांच्यामुळे अनेक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वाद निर्माण झाले. असाच एक चित्रपट ज्यामुळे अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना घर सोडून गेली होती. नेमकं काय घडलेलं?

अक्षय कुमारचं या अभिनेत्रीसोबत अफेअर, समजताच ट्विंकल खन्नाने सोडलेलं घर, अक्षयने अर्धवट सोडलेला चित्रपट
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 14, 2026 | 2:54 PM
Share

Akshay Kumar : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे त्यांच्या कथेमुळे नाही तर चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयामुळे चर्चेत आले आहेत. 2000 च्या सुरुवातीला बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्यातील नात्याच्या चर्चांनी मोठी खळबळ उडवली होती. ‘अंदाज’, ‘ऐतराज’ आणि ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’ या चित्रपटांमधील त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तर दुसरीकडे त्यांच्या कथित अफेअरच्या बातम्यांनीही जोर धरला. या चर्चांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाल्याची चर्चा त्या काळात रंगली होती.

दरम्यान, चित्रपट निर्माता सुनील दर्शन यांच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्या काळातील काही महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

‘बरसात’ चित्रपटातून अक्षय कुमार बाहेर का पडले?

सुनील दर्शन यांनी सांगितले की, ते 2005 साली ‘बरसात’ या चित्रपटावर काम करत होते. हा चित्रपट 1995 मध्ये आलेल्या बरसात ज्यात ट्विंकल खन्ना आणि बॉबी देओल होते. या चित्रपटापेक्षा वेगळा होता. 2005 च्या ‘बरसात’मध्ये सुरुवातीला प्रियंका चोप्राच्या अपोजिट अक्षय कुमारची निवड करण्यात आली होती.

चित्रपटाचे काही भाग आणि एक गाणेही अक्षय कुमार व प्रियंका चोप्रासोबत शूट करण्यात आले होते. मात्र, त्याच काळात अक्षय कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव वाढू लागला. त्याच्या आणि प्रियंका चोप्राच्या अफेअरच्या चर्चांचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असल्याने अक्षय कुमारने स्वतः सुनील दर्शन यांच्याकडे चित्रपट सोडण्याची विनंती केली.

वैयक्तिक आयुष्याचा करिअरवर परिणाम

सुनील दर्शन यांनी मुलाखतीत असेही नमूद केले की, अशा परिस्थितीत जबाबदारी अधिक त्या व्यक्तीवर असते जी विवाहित असते. इंडस्ट्रीतील लोक परिस्थिती समजून घेतात, मात्र एक मर्यादा असते आणि ती ओलांडल्यास वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी प्रियंका चोप्राला दोष दिला नाही. त्यांच्या मते, प्रत्येक कलाकार आपल्या करिअर आणि संधींनुसार निर्णय घेतो.

पुन्हा शूट झालेले गाणे

विशेष म्हणजे, ‘बरसात’ चित्रपटातील एक पूर्ण गाणे आधी अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रासोबत शूट झाले होते. मात्र अक्षय कुमार चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर तेच गाणे पुन्हा बॉबी देओल आणि प्रियंका चोप्रावर चित्रित करण्यात आले. आजही या गाण्याचे दोन्ही व्हर्जन यूट्यूबवर उपलब्ध असून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.

Follow Us
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्.....
पुणे दारूकांडानंतर संतापाचा स्फोट! युवक काँग्रेस, गुलाबो गँग अन्......
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली..
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्याला बजावली...