AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तू लावलेला संडास सडून गेला, डबा आणून दे”, मतदानाला निघालेल्या अक्षय कुमारच्या समोर वृद्धाचा हट्ट अन् तक्रार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करायला गेलेल्या अक्षय कुमारसोबत एक अजब किस्सा घडला. तो जात असताना अचानक एक वृद्ध व्यक्तीने त्याला अडवून थेट शौचालयाची तक्रार करण्यास सुरुवात केली. तेव्हा अक्षय कुमार आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तू लावलेला संडास सडून गेला, डबा आणून दे, मतदानाला निघालेल्या अक्षय कुमारच्या समोर वृद्धाचा हट्ट अन् तक्रार
| Updated on: Nov 20, 2024 | 5:46 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान सुरु आहे, सामान्यांपासून ते राजकारणी, सेलिब्रेटी सर्वच आपाला मतदानाचा हक्क बजावत आहे. एवढच नाही तर त्याबद्दल त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टही करत आहे. तसेच त्यांनी केलेल्या मतदानाचे व्हिडीओ फोटोही सोशल मीडियावर येत आहे. अक्षय कुमारच्या बाबतीत मात्र मतदानाला जाताना त्याच्या सोबत एक वेगळाच किस्सा घडला.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४चं मतदान करण्यासाठी मुंबईत आला होता. अक्षय कुमारला मतदानासाठी जात असताना त्याला रस्त्यातच एका वृद्ध व्यक्तीने अडवले. त्याने बसवलेली शौचालये सडल्याची तक्रार त्याने अक्षयकडे करण्यास सुरुवात केली.

त्याचं झालं असं,अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट २०१७ मध्ये आला होता. त्यावेळी ट्विंकल खन्नाने जुहू बीचचा फोटो पोस्ट करत उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांकडे लक्ष वेधले होते. २०१८मध्ये अक्षय कुमारने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिळून जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर १० लाख रुपये किमतीचे बायो टॉयलेट बसवले होते. अक्षय कुमारच्या या कामाचे खूप कौतुकही झाले होते. मात्र, आता तेच टॉयलेट खराब झाल्याचे या वृद्धाने त्याच्या लक्षात आणून दिले आहे.

त्यासाठी त्या वृद्धाने ते बायो टॉयलेट सडल्याची तक्रार अक्षय कुमारकडे केली. त्यावर अक्षयने आपण या संदर्भात बीएमसीशी बोलणार असल्याचे उत्तर दिले. त्यावर त्या वृद्धाने अक्षयने आणखी अशी शौचालये बसवावीत, अशी मागणीही केली. तसेच त्याने सांगितले की त्याने बांधलेले टॉयलेट सडले आहे. तीन-चार वर्षांपासून स्वच्छतागृहांची देखभाल तोच व्यक्ती करत असल्याचे त्याने सांगितले.

या जेष्ठ नागरिकाचं बोलणं ऐकल्यानंतर अक्षय हसला आणि त्याने उत्तर देत म्हटलं की, ‘ठीक आहे, आपण यावर काम करूया. मी बीएमसीशी बोलणार आहे.’ मग, त्या व्यक्तीने अक्षयला सांगितले, हे टॉयलेट हे लोखंडाचे आहेत, त्यामुळे ते लवकर सडतात. त्यात वेळोवेळी भरपूर पैसे खर्च करावे लागतो. यावर अक्षय उत्तर देत म्हणतो की, ‘आपण यावर नक्की बोलूया, काय करता येईल ते बघूया. महापालिकेने त्यांची काळजी घेणे अपेक्षित होते.’

यावर तो वृद्ध व्यक्ती अक्षयला म्हणतो की, ‘तु डबा दे, मी तो लावून घेतो आणि त्यात फार काही काम नाही.’ यावर अक्षयने उत्तर दिले की, ‘मी डब्बा तर आधीच दिला आहे.’ मग तो माणूस म्हणतो, ‘तोच सडला आहे.’ यावर अक्षय म्हणतो की, ‘तो डब्बा सडला आहे, तर आता बीएमसी बघेल.’अशा पद्धतीने या दोघांच्याही संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बरं या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले आहे. अक्षय कुमारने किमान त्या व्यक्तीची बाजू ऐकून घेतली त्याच्याशी शांतपणे बोलला याबद्दल सर्वजन त्याचे कौतुक करत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.