Akshay Kumar : अक्षय कुमारच्या घरात भटकत्या महिलेची आत्मा! बायकोला झालेला भास, तर मुलासोबत घडलेली भयानक घटना
Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार याच्या घरात भटकत्या महिलेची आत्मा असल्याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला. ट्विंकल खन्ना हिला देखील भास झालेला, तर खिलाडी कुमारच्या मुलासोबत भयानक घटना घडलेली...

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार याने अनेक जॉनरच्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. कायम एकापेक्षा एका भूमिका साकारणार अक्षय आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याने भुताच्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकरली आहे. पण आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, अभिनेत्यांने खऱ्या आयुष्यात देखील भूताचा अनुभव घेतला. एका मुलाखतीत अभिनेत्याने याबद्दल सांगितलं आहे. सुरुवातील पत्नी आणि अभिनेत्री ट्विकंल खन्ने भास झाल्याचं सांगितल्यानंतर अक्षयने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाला इतकी शिकलेली आहे आणि या गोष्टींवर विश्वास ठेवते. पण मुलासोबत भयानक घटना घडल्यानंतर अभिनेत्याचे डोळे उघडले.
नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्याला विचारण्यात आलं, भूतांवर विश्वास ठेवतो. यावर अभिनेता म्हणाला, ‘अशा गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.’ पण अभिनेत्याचे खासगी आयुष्यात भयानक परिस्थिती अनुभवली आहे. दुसऱ्या घरात असताना कुटुंबियांनी वाईट शक्तींचा अनुभव घेतला. अक्षय म्हणाला, ‘आम्ही अशा एका घरात राहिलो आहे. जेथे माझी कायम म्हणायची येथे मी काहीतरी पाहिलं आहे.’
मुलासोबत घडलेली घटना सांगत अभिनेता म्हणाला, ‘माझा मुलगा आरव चार ते पाच वर्षांचा असेल आणि त्याला म्हणायचो, ‘टीना तू शिकलेली आहेस, तरी देखील अशा गोष्टींवर विश्वास कशी ठेवू शकते? पण एके दिवशी ती ठामपणे म्हणाली, आपल्या घरात मला एक महिला फिरताना दिसते.’
पुढे अक्षय कुमार म्हणाला, सुरुवातील मी तिची कोणतीच गोष्ट ऐकली नाही. पण जेव्हा माझ्या मुलासोबत वाईट घटना घडली तेव्हा मला वाईट लाटलं. माझा मुलगा बेडवर झोपलेला होता. अचानक त्याने इशारा केला आणि म्हणाला, ‘इकडे येऊ नको, येथून चालती हो…’
‘मी त्याला विचारलं तू कोणाशी बोलत आहेत? काही सेकंदांसाठी मी देखील हैराण झालेलो. तेव्हा माझी बायको म्हणाली, मी तुला सांगितलं होतं घरात कोणीतरी आहे… आपला मुलगा देखील कोणाशी बोलत आहे…’ असं देखील अक्षय कुमारा कार्यक्रमात म्हणालेला.
