अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक लाँच

अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक लाँच

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा नवीन चित्रपट ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शन करण्याची तारीखही ठरवण्यात आली आहे. हा चित्रपट 2020 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षयच्या भूमिकेचे नाव सूर्यवंशी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे.

फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिलं आहे की, 

सिंबा चित्रपटा दरम्यान अक्षयने या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केलं आहे. सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला आहे. चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. सिंबा हा 2018 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून ठरला आहे. चित्रपटात रणवीर सिंह आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. रोहित शेट्टी यांनी सिंबा चित्रपटाशिवाय दिलवाले, सिंघम, चेन्नई एक्स्प्रेस, गोलमाल सीरीज, बोल बच्चन आणि ऑल द बेस्ट सारखे चित्रपट बॉलिवूडमध्ये दिले आहेत. आतापर्यंत रोहित शेट्टी यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत.

अक्षय कुमारचा केसरी चित्रपट सध्या होळी वीकेंडमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय आगामी चित्रपट गुडन्यूज, मिशन मंगल, हाऊसफुल्ल 4 चा समावेश आहे. सध्या अक्षय गुडन्यूजची शूटिंग करत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI