Akshaya Deodhar : अहाSS, शेवटी राणादाचं आणि पाठक बाईचं जमलंच की, अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी Engaged !

तुझ्यात जीव रंगला मालिकेतली फेमस जोडी शेवटी खरोखरच जीवन बंधनात अडकलीय. कारण अक्षरा देवधर आणि हार्दीक जोशी यांनी साखरपुडा केलाय. दोघांनीही सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटोज शेअर केलेत.

Akshaya Deodhar : अहाSS, शेवटी राणादाचं आणि पाठक बाईचं जमलंच की, अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी Engaged !
अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी
Image Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2022 | 8:55 PM

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींचा धुराळा उडालेला असतानाच मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतून आनंदाची बातमी आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतली फेमस जोडी शेवटी खरोखरच जीवन बंधनात अडकलीय. कारण अक्षरा देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दीक जोशी (Hardik Joshi) यांनी साखरपुडा केलाय. दोघांनीही सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटोज शेअर केलेत. अविश्वसनीय वृत्त- अक्षरा तशी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. वेगवेगळ्या जाहीराती आणि भटकंती ती करताना दिसते. सोशल मीडियावर दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आले त्यावेळेस त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. ही कुठल्या तरी प्रोडक्टची किंवा मालिकेची सुरुवात तर नाही ना असं वाटलं. पण थोडा वेळ गेल्यानंतर दोघांच्या अकाऊंटवरुन फोटो शेअर झाले आणि शेवटी बातमी पक्क झाली. तुझ्यात जीव रंगलाची पाठक बाई आणि राणादानं खरोखरंच (Tuzyat Jiv Rangla) एकमेकांना जोडीदार म्हणून निवडलं आणि त्याची पक्की खूणगाठ म्हणून साखरपुड्याचा सोहळाही पार पडला. अक्षरानं फोटो शेअर करताना अहाSS फायनली Engaged असे शब्द टाकलेत. कदाचित रिल लाईफमध्ये जे काही घडलं ते रिअल लाईफमध्येही घडेल यावर तिचा विश्वास नसावा. त्यामुळेच एवढा गोड सोहळा तिला स्वप्नवत वाटत असावा. फायनली ती एंगेज झालीय हेच खरं.

अरक्षया देवधरची इन्स्टा पोस्ट

अक्षयाची दुसरी पोस्ट

तिसरी पोस्ट

कोण आहेत अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी?

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. यातली त्यांचीही नावंही तितकीच गाजली, पाठक बाई आणि राणा दा…अशी नावं त्यांची या मिलेकत होते. मालिका संपल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते आणि आता दोघांनी साखरपुडा आटोपलाय.

हार्दिक जोशीची पोस्ट

मालिकेने घराघरात पोहोचले

तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी ठरली आहे. यात हार्दिक जोशी हा राणा दा…म्हणजेच एका पैलावानाची भूमिका साकारताना दिसून आला आहे. तर दुसरीकडे त्याच्या उलट अक्षया देवधर ही पाठक बाई म्हणजे शिक्षिका दाखवण्यात आली आहे. या दोघांची या मालिकेतील केमिस्ट्री चांगलीच चर्चेत राहिली आहे.