अक्षय खन्ना Vs रणवीर सिंह: संपत्तीच्या बाबतीत कोण ‘धुरंधर’?
'धुरंधर' या चित्रपटामुळे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या अक्षय खन्ना आणि रणवीर सिंह यांच्यापैकी कोण सर्वाधिक श्रीमंत आहे, याबद्दल जाणून घेऊयात.. या चित्रपटात अक्षयने रेहमान डकैतची आणि रणवीरने हमजाची भूमिका साकारली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी बॉक्स ऑफिसवर त्याचा धुमाकूळ सुरूच आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकीच एक भूमिका अभिनेता अक्षय खन्नाची आहे. रेहमान डकैतच्या खलनायकी भूमिकेतूनही त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर हमजाच्या भूमिकेतील रणवीर सिंहच्या अभिनयाचंही खूप कौतुक होत आहे. रणवीर आणि अक्षय यांच्यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजतोय. या दोघांसोबतच चित्रपटात आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. रणवीर आणि अक्षय यांच्यापैकी कोणाकडे सर्वाधिक संपत्ती आहे, त्याविषयी जाणून घेऊयात..
‘बिझनेस टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंहची एकूण संपत्ती जवळपास 400 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर त्याची ब्रँड व्हॅल्यू 170.7 दशलक्ष डॉलर आहे. ‘न्यूज 18’च्या मते, रणवीर सिंह एका चित्रपटासाठी 30 ते 50 कोटी रुपये मानधन मिळतं. तर एका ब्रँड डीलसाठी तो तीन ते पाच कोटी रुपये स्वीकारतो. सोशल मीडियावरील एका पोस्टसाठी रणवीर 80 लाख रुपयांपर्यंत फी घेतो. रणवीरकडे मुंबईत 40 कोटी रुपयांचा 5 BHK अपार्टमेंट आहे. याशिवाय त्याचा एक सी-फेसिंग बंगलासुद्धा आहे. या बंगल्याची किंमत तब्बल 119 कोटी रुपये आहे. रणवीरच्या नावावर आणखी एक अपार्टमेंट असून त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. त्याचा अलिबागमध्येही एक व्हिला आहे, ज्याची किंमत 22 कोटी रुपये आहे. रणवीरला कार कलेक्शनची फार आवड आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर, जॅग्वॉर, मर्सिडीज बेंज आणि लॅम्बॉर्गिनी यांसारख्या गाड्या आहेत.
अक्षय खन्ना किती श्रीमंत?
‘बिझनेस टुडे’च्या रिपोर्टनुसार, अक्षय खन्नाची एकूण संपत्ती 167 कोटी रुपयांच्या घरात आहे. अक्षय खन्नाचे सोशल मीडियावर कोणतेच अकाऊंट्स नाहीत, त्यामुळे तिथून त्याची कमाई होत नाही. परंतु जुहूमध्ये त्याचा खूप सुंदर बंगला आहे. त्याला रिअल इस्टेट पोर्टफोलिओ 100 कोटींपेक्षा जास्त आहे. अक्षयच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू 5 सीरिज, टोयोटा फॉर्च्युनर यांचा समावेश आहे.
‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कमाईचे मोठे विक्रम आपल्या नावे केली. चौथ्या आठवड्यातही चित्रपटाने दमदार कामगिरी केली. विेशेष म्हणजे याआधी कोणत्याच भारतीय चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली नव्हती. परंतु रणवीर सिंहच्या या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 62 कोटी रुपये कमावून सर्व विक्रम मोडले.
