AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुंबाड 2’ साठी आलिया भट्ट का योग्य ? सोहम शाह स्पष्टच बोलला..

अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘तुंबाड 2’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात सोहम शाहसोबत आलिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी लीड रोलमध्ये दिसतील. या चित्रपटासाठी आलियाच योग्य निवड का, याबद्दल सोहम शाहने सांगितलं..

‘तुंबाड 2’ साठी आलिया भट्ट का योग्य ? सोहम शाह स्पष्टच बोलला..
| Updated on: Oct 10, 2026 | 6:18 PM
Share

सोह शाह हा त्याच्या ‘तुंबाड’ चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येतोय. 2018 साली रिलीज झालेल्या या फिल्मचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तुंबाड 2’ साठी सगळेच उत्सुक आहेत. विशेष म्हणजे आता ‘तुंबाड 2’ मध्ये चक्क अभिनेत्री आलिया भट्ट ही दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता तर आणखीनच वाढली आहे. या चित्रपटाद्वारे आलिया पहिल्यांदाच एखाद्या हॉरर फिल्ममध्ये काम करणार आहे. मात्र आलियाने या चित्रपटाला होकार कसा दिला, तिची या चित्रपटासाठी निवड कशी झाली, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत, त्याचंच उत्तर आता सोहम साहने दिलं आहे.

अभिनेत्याच्या सांगण्यानुसार, अवघ्या 2 भेटीतच आलिया या चित्रपटात काम करण्यास तयार झाली होती. तिच्यासारख्या मोठ्या अभिनेत्रीसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दलही सोहमला विचारण्यात आलं असता, तो म्हणाला की स्क्रिप्टमधल्या ज्या चांगल्या गोष्टी, प्लस पॉइंट्स होते, ते लगेच तिच्या लक्षात आले. खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट तयार करणारे लोक काही इंडस्ट्रीतील मोठ्या आणि प्रसिद्ध दिग्दर्शकांसारखे स्थापित नाव नव्हतं, तरीही आलियाने कथेवर विश्वास ठेवला.

आलियाने का निवडला तुंबाड 2 ?

सोहम शाहने ‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “आम्ही आलियाला चित्रपटाची कथा ऐकवली आणि तिने स्क्रिप्ट वाचली. तिला कथा आणि स्क्रिप्ट दोन्ही आवडल्यामुळे तिने लगेचच होकार दिला. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया खूप सहज पार पडली. आलिया कामाच्या बाबतीत अतिशय गंभीर आणि प्रोफेशनल आहे. तिच्यासोबत काम करताना आम्हाला खूप चांगला अनुभव आला.”

सोहमने आलियाच्या अभिनयकौशल्यासोबतच तिच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचेही कौतुक केले. पहिल्याच भेटीत तिने कथेशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. त्यावरून चित्रपटातील बारकावे समजून घेण्याची तिची क्षमता लक्षात आल्याचे त्याने सांगितलं. याबाबत सोहम म्हणाला, “आलिया खूप हुशार आणि समजूतदार आहे. ती जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच तिची व्यावसायिक समजही चांगली आहे. आमच्या पहिल्या भेटीत तिने काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. नेमके कोणते प्रश्न होते, हे मला आता आठवत नाही. मात्र, तिने कथा ऐकल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांत स्क्रिप्ट वाचून पूर्ण केली. त्यानंतर आमची पुन्हा भेट झाली आणि केवळ दोन भेटींमध्येच आलियाला चित्रपटासाठी साइन करण्यात आले.”

आलियाला ‘तुंबाड ‘ बद्दल आधीपासूनच माहीत होतं आणि तिला कहाणी आवडली होती, असंही त्याने नमूद केलं. तुंबाड चित्रपट रिलीज होऊन 8 वर्ष उलटली आहे, तर याचा सीक्वेल असलेला तुंबाज 2 डिसेंबर 2027 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट अतिशय मोठ्या स्केलवर तयार करण्यात येत असून मुंबईत 7-8 कोटींचा सेट उभारण्यात आला आहे. चित्रपटाचं बजेट जवळपास 100 कोटी आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे