Ranbir Alia: रणबीर-आलियाच्या लेकीचं नाव ठरलं; नातीचं नाव ऐकून भावूक झाल्या नीतू कपूर

नीतू कपूर यांच्यासाठी भावूक क्षण; रणबीर-आलियाने ठरवलं मुलीचं खास नाव

Ranbir Alia: रणबीर-आलियाच्या लेकीचं नाव ठरलं; नातीचं नाव ऐकून भावूक झाल्या नीतू कपूर
Ranbir Alia: रणबीर-आलियाच्या लेकीचं नाव ठरलं
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2022 | 11:09 AM

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. रणबीर आणि आलिया सध्या चिमुकल्या पाहुणीची काळजी घेण्यात व्यग्र झाले आहेत. आलियाच्या छोट्याशा परीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांपासून फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा उत्सुक आहेत. तर सोशल मीडियावर मुलीच्या नावाविषयीही चर्चा सुरू झाली आहे. आलिया आणि रणबीर त्यांच्या मुलीचं नाव काय ठेवणार, यावरून विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचं नाव दिवंगत अभिनेते आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल 2020 रोजी निधन झालं. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली होती.

आता नातीचं नाव ऋषी कपूर यांच्या नावावरून ठेवण्यात येणार असल्याने नीतू कपूर भावूक झाल्याचं कळतंय. पापाराझींशी बोलताना नीत कपूर यांनी अनेकदा नातीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘खूप गोड मुलगी आहे’, असंही त्या म्हणाल्या.

रणबीर आणि आलिया लवकरच त्यांच्या मुलीचं नाव जाहीर करणार आहेत. आलियाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये तिच्या हातातील कॉफीच्या कपवर ‘मम्मा’ (आई) असं लिहिल्याचं पहायला मिळालं. रणबीर-आलियाने अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आई आणि बाबा म्हणून आपल्या आयुष्याच्या या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

आलियाने 6 नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला. याच वर्षी एप्रिल महिन्यात रणबीर-आलियाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर जून महिन्यात तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं. लग्नानंतर दोन महिन्यांतच आलियाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली होती.