AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ वर ‘या’ देशाने लावली कात्री, कारण…

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दाक्षिणात्य सिनेमांपासून हिंदी सिनेमापर्यंत प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 'पुष्पा २'चा देशासह परदेशातही दबदबा आहे. सौदी अरेबियातही अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' वर 'या' देशाने लावली कात्री, कारण...
पुष्पा
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 1:24 PM
Share

Pushpa 2 Movie : देश-विदेशापर्यंत सध्या ‘पुष्पा २’चे सेलिब्रेशन सुरू आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात या चित्रपटाची जेवढी क्रेझ पाहायला मिळतेय, तितकीच परदेशातही ‘पुष्पा २’चे चाहते आहेत. आता पुष्पा २ च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ सुरू झाला आहे. ‘पुष्पा २’ पाहण्यासाठी चाहते आधीच थिएटरबाहेर गर्दी करून होते. यादरम्यान सौदी अरेबियात ‘पुष्पा २’ या चित्रपटाचा कालावधी थोडा कमी करून दाखवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वत्र पुष्पा२ रिलीज झाल्याने हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर गर्दी करण्यात आली होती. तर या चित्रपटाच्या रन टाइमबद्दल बोलायचे झाले तर भारतात ‘पुष्पा २’चा कालावधी २००.३३ मिनिटांचा आहे. तर सौदी अरेबियात तो थोडा कमी दाखवण्यात येणार आहे. कारण सौदी अरेबिया सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही भागांवर बंदी घातली आहे. या चित्रपटाचा कालावधी १९ मिनिटांनी कमी केला आहे. त्यामुळे तेथील प्रेक्षकांना हा चित्रपट 2 तास 1 मिनिटांसाठी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाची काही भाग कट केल्यानंतर तो तेथे प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

‘पुष्पा २’ सौदी अरेबियात जलवा

सौदी अरेबिया सेन्सॉर बोर्डाला बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटातील कोणतीही गोष्ट आवडत नसेल तर ती त्यांच्यावर बंदी घालते. पण ‘पुष्पा २’ची क्रेझ इतकी आहे की तिथेही अल्लू अर्जुन झुकला नाही. अल्लू अर्जुन आणि त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची परदेशात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी तिकिटे बुक करण्याची वाट पाहत होते.

पहिल्याच दिवशी अल्लू अर्जुनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पैशांची तगडी कमाई करेल, अशी अपेक्षा ‘पुष्पा २’मधून व्यक्त केली जात आहे. चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशी मोठे विक्रम मोडू शकते. या चित्रपटात रश्मिका मंदाना पुन्हा श्रीवल्ली बनताना पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक होते. आता ‘पुष्पा २’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहात जाऊनही तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी