महिलाच्या गंभीर आरोपांनंतर कसं आयुष्य जगतायेत ‘संस्कारी बाबूजी’, जवळच्या मित्राकडून मोठा खुलासा
बलात्कारासारख्या गंभीर आरोपांनंतर सर्वांपासून दूर कसं आयुष्य जगत आहेत 'संस्कारी बाबूजी'? अनेक वर्षानंतर जवळच्या मित्राकडून मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र अभिनेते आलोक नाथ यांच्या आयुष्याची चर्चा...

आलोक नाथ यांचं नाव ऐकल्यानंतर सर्वांना ‘संस्कारी बाबूजी…’ आठवत असतील. जे कायम त्यांच्या कुटुंबियांचा सांभाळ करताना आणि नव्या पिढीसोबत जुळवून घेताना दिसले. फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर, मोठ्या पडद्यावर देखील अनेक सिनेमांमध्ये त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता आलोक नाथ कुठे आहेत आणि काय करतात याबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही. महिलांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले, तेव्हा पासून आलोक नाथ कधीच समोर आले नाहीत.
लहानपणीच्या मित्राने केला मोठा खुलासा…
MeToo दरम्यान आलोक नाथ यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. असं देखील सांगण्यात आलं होतं की, दारु प्यायल्यानंतर त्यांचं स्वतःवर नियंत्रण नसतं… या सर्व आरोपांनंतर आलोक नाथ यांनी स्वतःला सर्वांपासून दूर ठेवलं. ते इंस्ट्रीतून गायबच झाले… आता त्यांचा लहानपणीचा मित्र राजेश पुरी यांनी आलोक नाथ यांच्या अवस्थेबद्दल सांगितलं आहे.
राजेश पुरी म्हणाले, ‘पहिल्यांदा दिल्लीहून मुंबईत एकाच ट्रेनमध्ये आलेलो. लोकप्रियता मिळण्यापूर्वीचा काळ आम्ही एकत्र पाहिला आहे… यशाची उच्च शिखरावर वाटचाल होत असताना आलोक आणि मी एकत्र होतो.. पण आरोपांनंतर ते पूर्णपणे खचले आहेत. मी त्यांना सांगतो भेटायला तरी या… तेव्हा फक्त होकार देतात आणि त्यानंतर कोणताच संपर्क होत नाही.’
‘कधी बोलले तर आमच्यात गप्पा रंगतात… पण कधी कधी पश्चाताप होतो की एक चांगला अभिनेता आता दूर आहे… आलोक आता स्वतःच कोणती ऑफर स्वीकारत नाहीत. त्यांनी विचारलं तर म्हणतात, मी घरीच काम करत आहे… आता हे माहिती नाही की, ते काय काम करतात. पण मला असं वाटतं सध्या त्यांच्याकडे कोणतंच काम नाही… ‘ असं देखील राजेश पुरी म्हणाले.
आलोक नाथ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम आपके हैं कौन’, ‘विवाह’, ‘हम साथ साथ हैं’ यांसारख्या सिनेमांमध्ये आणि ‘बुनियाद’, ‘विदाई’ मालिकांमधून त्यांनी वडिलांची बाजू जगासमोर आणली आणि ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून प्रसिद्ध झाली. असं देखील सांगण्यात येतं की, अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर त्यांनी हिरो म्हणून स्वतःची ओळख भक्कम करायची होती. पण ‘बाबूजी’ म्हणून त्यांनी चाहत्यांनी स्वीकारलं… आलोक नाथ यांनी त्यांच्या करियरमध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त सिनेमे आणि 15 मालिकांमध्ये काम केलं आहे.
