हिंदू गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यापूर्वी अभिनेत्याने ठेवली ही अट; स्पष्ट म्हणाला..

अली आणि जास्मीन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच हे दोघं एकाच घरात राहू लागले. लिव्ह-इन रिलेशनशिपचा निर्णय घेण्यापूर्वी अलीने जास्मीनसमोर एक अट ठेवली होती. ही अट कोणती, ते पहा..

हिंदू गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्यापूर्वी अभिनेत्याने ठेवली ही अट; स्पष्ट म्हणाला..
Jasmine Bhasin and Aly Goni
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2025 | 3:58 PM

‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अली गोणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. गणेशोत्सवादरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याने अलीला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड जास्मीन भसीनचा बुरखा घातलेला फोटो समोर आला. यावरूनही ट्रोलर्सनी त्याला घेरलं. या दोन्ही घटनांवर अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं. मी मुस्लीम असल्याने देवाची पूजा कशी केली जाते, हे मला माहीत नाही. काहीतरी चुकीचं घडू नये या विचारात असल्याचं त्याने सांगितलं. तर दुसरीकडे जास्मीनचा अबाया घातलेला फोटो हा अबू धाबीमधील शेख जायद मशीदमधील असल्याचं त्याने म्हटलं होतं. तिथे जो कोणी जातो, त्याला अबाया घालूनच आत जावं लागतं. अन्यथा तुम्हाला आत प्रवेश मिळत नाही, असं त्याने स्पष्ट केलं. त्यानंतर आता तो जास्मीनसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

अली आणि जास्मीन गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आहेत. दोघं नुकतेच एका घरात शिफ्ट झाले आणि याविषयी त्यांनी युट्यूब व्हिडीओद्वारे चाहत्यांना सांगितलं होतं. त्याचसोबत अलीने लिव्ह-इनमध्ये राहण्यापूर्वी जास्मीनसमोर एक अट ठेवल्याचा खुलासा अलीने केला आहे. जास्मीन आणि अली त्यांच्या युट्यूब चॅनलवर विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात. या व्हिडीओमध्ये पहायला मिळालं की अली आणि जास्मीन यांच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत. कारण दोघांनाही त्यांची स्वतंत्र जागा प्रिय आहे. अलीची अट हीच होती की जर ते दोघं एकाच घरात राहिले, तर त्यांचे रुम वेगवेगळे असतील. कारण त्याला त्याच्या वैयक्तिक जागेशी तडजोड करायची नव्हती.

‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत अलीने सांगितलं की लिव्ह-इनमध्ये राहिल्यापासून त्याच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. “आम्हा दोघांचे रुम्स वेगवेगळे आहेत. मी जास्मीनसमोर हीच अट ठेवली होती की मला माझी वैयक्तिक जागा हवी. ही चांगली गोष्ट आहे”, असं तो म्हणतो. अली आणि जास्मीन ‘खतरों के खिलाडी’ या शोदरम्यान पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर ‘बिग बॉस 14’दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून अली आणि जास्मीन एकमेकांना डेट करत आहेत.