AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमीषा पटेल-अरबाज खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत! हातात हात घालून चालताना दिसली जोडी

अभिनेत्री अमीषा पटेल आणि अरबाज खान यांच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. थायलंडमध्ये हे दोघं हातात हात घालून दिसले. इतकंच नव्हे तर क्लबमध्ये दोघांनी डान्ससुद्धा केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अमीषा पटेल-अरबाज खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत! हातात हात घालून चालताना दिसली जोडी
Ameesha Patel and Arbaaz KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2023 | 8:24 AM
Share

मुंबई : 25 नोव्हेंबर 2023 | ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश चाखल्यानंतर अभिनेत्री अमीषा पटेलला नुकतंच थायलंडमध्ये पाहिलं गेलं. मात्र यावेळी अमीषासोबत तिचा तारा सिंग नव्हे तर अभिनेता अरबाज खान होता. अमीषा आणि अरबाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अमीषा आणि अरबाज एकमेकांच्या हातात हात घालून थायलंडमध्ये एका क्लबच्या उद्धाटनासाठी पोहोचले होते. यावेळी अरबाजने ब्लॅक टी-शर्ट आणि ग्रे जॅकेट घातला होता. तर दुसरीकडे अमीषाने ब्लॅक मिनी ड्रेस परिधान केला होता. क्लबमध्ये हो दोघं हातात हात घालून आले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या. या दोघांनी क्लबमध्ये डान्ससुद्धा केला.

अमीषा आणि अरबाजचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. ‘या दोघांची जोडी खरंच छान वाटतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘सुपर ॲमी आणि सुपर अरबाज’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. या दोघांनी एकमेकांना डेट करायला हवं, असंही काही नेटकऱ्यांनी सुचवलंय. विशेष म्हणजे अमीषाची सलमान खानसोबत खूप चांगली मैत्री आहे. एका मुलाखतीत अमीषाने सलमानचा उल्लेख ‘खट्याळ बेस्ट फ्रेंड’ असा केला होता. ‘ये है जलवा’ या चित्रपटात तिने सलमानसोबत काम केलं होतं. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही.

पहा व्हिडीओ

एका मुलाखतीत अमीषाला तिच्या अशा एका चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं होतं, ज्यामध्ये हिट होण्याची क्षमता असूनही तो फ्लॉप ठरला होता. तेव्हा तिने लगेचच 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये है जलवा’ या चित्रपटाचं नाव घेतलं होतं. यामध्ये अमीषा आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं फ्लॉप होण्यामागचं कारण तिने सलमानचा ‘हिट अँड रन’ केस असल्याचं म्हटलं होतं.

“ये है जलवा हा डेविड धवन यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. त्यात सलमान खूप हँडसम दिसत होता. त्यातील म्युझिक आणि दिग्दर्शन चांगलं होतं. पण त्यापूर्वी माध्यमांनी दिलेल्या नकारात्मक बातम्या प्रेक्षकांना आवडल्या नाहीत. त्या काळी प्रेक्षक आपल्या लाडक्या अभिनेत्याबद्दल नकारात्मक बातमी पचवू शकत नव्हते. सलमानचा हिट अँड रन केस तेव्हाच घडला आणि त्यामुळे ये है जलवा हा चित्रपट बाजूला सारला गेला”, असं अमीषा म्हणाली होती.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.