तू सलमान खानशी लग्न कर.. ‘त्या’ सल्ल्यावर अमीषा पटेल काय म्हणाली ?

अमीषा पटेल आणि सलमान खान या दोघांनी भलेही एकाच चित्रपटात काम केलं असलं तरीही ते दोघे चांगले मित्र आहेत. अमीषा बऱ्याचदा सलमानबद्दल बोलताना दिसते. नुकतेच एका चाहत्याने दोघांना एकमेकांशी लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यावर अमीषाने दिलेली रिॲक्शन चर्चेत आहे.

तू सलमान खानशी लग्न कर.. त्या सल्ल्यावर अमीषा पटेल काय म्हणाली ?
अमीषा पटेल आणि सलमान खानचं लग्न ? कोणी दिला अजब सल्ला
Image Credit source: social media
| Updated on: Jun 23, 2024 | 1:05 PM

अमीषा पटेल ही बॉलिवूडच्या नामवंत आणि सौंदर्यवती अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून तिने हृतिक रोशनसोबत पदार्पण केलं आणि अनेक हिट चित्रपट दिले. मधल्या काही काळांत ती चित्रपटांपासून दूर होती. मात्र गेल्या वर्षी ती पुन्हा सनी देओल याच्यासोबत ‘गदर 2’ मध्ये झळकली आणि त्या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. तेव्हापासून अमीषा ही देखील सदैव चर्चेत आहे. मात्र तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अमिषा सध्या सिंगल असून मस्त जीवन जगत आहे. तिने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे चाहत्यांशी संवाद साधला, ज्यामध्ये तिला लग्नाबद्दल आणि नातेसंबंधाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाला अमिषाने समर्पक उत्तर दिले. ते वाचून तुम्हालाही हसू येईल.

X ( पूर्वीच ट्विटर ) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अमिषाने चाहत्यांसोबत एक सेशन केले आणि त्यांच्या अनेक प्रश्नांना देखील उत्तरं दिली. त्याचवेळी एका चाहत्याने तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारला. तू लग्न कधी करणार, असा सवाल तिला विचारण्यात आला. तेव्हा अमीषा म्हणाली की, मी मिस्टर राईट (योग्य जोडीदार) शोधत आहेत पण अजून तसं कोणी सापडलंच नाही, नाहीतर बरंच आधी माझं लग्न झालं असतं. त्यानंतर एका चाहत्याने अमीषाला अभिनेता सलमान खान याच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला, कारण ते दोघेही अविवाहीत आहेत. त्यावर अमीषाने दिलेली रिॲक्शन आणि तिचं उत्तर खूर मजेशीर होतं. त्याचीच चर्चा सुरू आहे. सलमानशी लग्न करण्याच्या सल्ल्यावर अमीषा म्हणाली, ‘ सलमानचं लग्न झालं नाही, मी ही अविवाहीत आहे. म्हणून आम्ही दोघांनी लग्न करावं असं तुम्हाला वाटतं ? आमच्या लग्नासाठी हे काय लॉजिक आहे ! लग्न आहे की एखादा फिल्म प्रोजेक्ट?’ असं म्हणतं अमीषाने हसणाऱ्या ईमोजीही टाकल्या आहेत. चाहत्याच्या प्रश्नावर आणि त्याच्या सल्ल्यावर न भडकता, अमीषाने हुशारीने उत्तरं दिलं, जे सध्या चर्चेत आहे.

 

सलमान खान आणि अमीषा पटेलचा चित्रपट

2002 साली प्रदर्शित झालेल्या ‘ये है जलवा’ चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अमीषा पटेल या दोघांनी एकत्र काम केलं होतं, पण तो बॉक्स ऑफीसवर फारसा चालल नाही. त्यानंतर एका मुलाखतीत अमीषाने एक वक्तव्य केलं होतं. सलमानच्या हिट अँड रन केसमुळे हा चित्रपट फ्लॉप झाला, असं तिचं म्हणणं होतं. हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. आणि सलमानही त्यात चांगला दिसत होता.पण हिट-अँड-रन प्रकरणामुळे मीडियाचे लक्ष चित्रपटाऐवजी या केसकडे अधिक होते, आणि त्याचा फटका चित्रपटाला बसला.

या व्यक्तींसोबत जोडलं गेलं अमीषा पटेलचं नाव

अमीषा पटेल हिचं नाव अनेक लोकांसोबत जोडलं गेलं होतं. दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि तिच्या नात्याचीही बरीच चर्चा झाली. मात्र त्यांचं नातं तुटल्यावर अमीषाचं नाव लंडनमधील बिझनेसमन कनव पुरी यांच्याशीही जोडलं गेलं होतं.