AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan: मी त्यांची माफी मागतो..; वचन दिलं अन् कामच केलं नाही, अखेर बिग बींनी सर्वांसमोर कबूल केली चूक

Amitabh Bachchan News: कौन बनेगा करोडपती या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी लोकांसमोर माफी मागितली आणि ते भावूक झाले.

Amitabh Bachchan: मी त्यांची माफी मागतो..; वचन दिलं अन् कामच केलं नाही, अखेर बिग बींनी सर्वांसमोर कबूल केली चूक
| Updated on: Oct 07, 2026 | 8:20 AM
Share

Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati: ‘कौन बनेगा करोडपती १८’ या क्विझ रिॲलिटी शोमध्ये एका स्पर्धकाशी बोलताना, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आपल्या वडिलोपार्जित गावाच्या आठवणीने भावूक झाले. त्यांनी आपल्या गावात मुलांसाठी ग्रंथालय उघडण्यास झालेल्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि लवकरच ते उघडण्याचे आश्वासन दिले.

‘केबीसी’च्या एका एपिसोडमध्ये, स्पर्धक चंद्र प्रकाश तिवारी यांनी आपण प्रतापगडचे असल्याचे उघड केले होते. बाबूपट्टी हे नाव ऐकताच अमिताभ भावूक झाले आणि त्यांनी सांगितले की, हे गाव त्यांच्या पूर्वजांचे जन्मस्थान होते आणि त्यांचे वडील, प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंश राय बच्चन, याच गावाचे रहिवासी होते. बिग बी म्हणाले, “बाबूपट्टी हे आमच्या पूर्वजांचे जन्मस्थान होते आणि बाबुजी तिथूनच आले होते.”

अमिताभ म्हणाले, “जेव्हा जयाजी आमच्यासोबत गावाला भेट द्यायला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी या गावात मुलांसाठी ग्रंथालय उघडणार असं म्हणाल्या होत्या. जेव्हा जयाजी आमच्यासोबत गावात गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी पाहिले की गावातील मुलांकडे शिकण्यासाठी योग्य जागा नाही. यानंतर, आम्ही दोघांनी मिळून गावात एक ग्रंथालय बांधण्याची योजना आखली. ग्रंथालयाची इमारत तयार असली तरी, काही अडथळ्यांमुळे सर्व सुविधा बसवण्यात आलेल्या नाहीत आणि ते अद्याप सुरू झालेले नाही.”

बिग बी म्हणाले, “काळजी करू नका, ग्रंथालय लवकरच सुरू होईल. विलंबाबद्दल माफी असावी आणि ग्रंथालय लवकरच सुरू करु, आम्ही बाबू पट्टीच्या लोकांची माफी मागतो. आम्ही केबीसीच्या मंचावरून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, काळजी करू नका, ग्रंथालय लवकरच सुरू होईल. इमारत पूर्ण झाली आहे आणि आता तिथे आवश्यक साहित्य आणि पुस्तके ठेवली जातील जेणेकरून मुले तिथे अभ्यास करू शकतील.”

जया बच्चन आणि माजी खासदार अमर सिंह यांनी २००६ मध्ये या ग्रंथालयाचे उद्घाटन केले होते. २० वर्षांपूर्वी, २००६ मध्ये, जया बच्चन आणि माजी खासदार अमर सिंह यांनी डॉ. हरिवंश राय बच्चन यांच्या स्मरणार्थ ‘डॉ. हरिवंश राय बच्चन मेमोरियल लायब्ररी’चे उद्घाटन केले होते. उद्घाटनानंतर, देखभालीच्या अभावामुळे आणि काही अडथळ्यांमुळे ग्रंथालय सुरळीतपणे चालू शकले नाही आणि त्याच्या इमारतीची दुरवस्था झाली.’

Follow Us
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय