Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं, तेव्हा बिग बींना मिळालेला सल्ला म्हणजे…

| Updated on: May 21, 2023 | 3:27 PM

नुकताच अमिताभ बच्चन यांचा शुटिंगच्या सेटवर अपघात झाल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत होते, आता बिग बी म्हणाले, 'नाकातून रक्त वाहत होतं आणि...'

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं, तेव्हा बिग बींना मिळालेला सल्ला म्हणजे...
Follow us on

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बिग बी यांचे चाहते फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. बिग बी कायम त्यांच्या चाहत्यांसोबत आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. बिग बींच्या लहानपणापासून ते त्यांच्या महानायक होण्यापर्यंतचा प्रवास चाहत्यांना वाचायला आणि ऐकायला आवडतो. नुकताच, अमिताभ बच्चन यांना दिवंगत वडील हरिवंशराय बच्चन यांनी दिलेली एक शिकवण आठवली. बिग बी शाळेत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना एक सल्ला दिला होता. आज अनेक वर्षांनंतर अमिताभ बच्चन यांनी ते क्षण पुन्हा ताजे केले आहे.. लहानपणीच्या आठवणीत कायम सर्वांचं मन रमतं.. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन आणि त्यांच्या लहानपणीच्या आठवणींची चर्चा रंगत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये बालपणीचा एक किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, जेव्हा बिग चौथी किंवा पाचवी इयत्तेत होते, तेव्हा त्यांनी बॉक्सिंग सामन्यात भाग घेतला होता आणि त्यांना दुखापत झाली होती. दुखापत झाल्यामुळे बिग बी यांनी वडिलांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या बदल्यात हरिवंशराय बच्चन यांनी बिग बींना एक पुस्तक पाठवलं होतं.

 

 

हरिवंशराय बच्चन यांनी १९५३ साली बिग बींसाठी केंब्रिजमधून एक पुस्तक पाठवलं होतं, त्या पुस्तकात अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी मुलासाठी एक संदेश लिहिला होता. नुकताच, जया यांना ते पुस्तक लायब्ररीतून मिळाल्याचं बिग बींनी सांगितलं आहे. वडील हरिवंशराय बच्चन यांची काही पुस्तकं लायब्ररी आहेत हे कळाल्यानंतर आकर्षण अधिक वाढतं..

बिग बी म्हणाले, ‘अचानक तुम्हाला एक पुस्तक भेटतं ज्यावर स्वाक्षरी आहे आणि ते पुस्तक तुम्हाला समर्पित केलेलं असतं.. हे पुस्तक माझ्या पत्नीद्वारे माझ्यापर्यंत आलं आहे.. पुस्तक आजही काही प्रमाणात ठिक आहे.. पुढे बिग बी म्हणतात, ‘बॉईज स्कूल १९५३-५४… तेव्हा मी चौथी – पाचवीमध्ये असेल.. बापूजी त्यांच्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये होते…’

‘मी शाळेत बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला होता. एका यशस्वी बाउटनंतर, पुढच्या फेरीत मी हारलो.. हारल्यानंतर माझ्या माझ्या नाकातून रक्त वाहू लागलं…’ त्याला उत्तर म्हणून बिग बींच्या वडिलांनी बॉक्सिंगचं पुस्तक पाठवलं होतं… त्या पुस्तकावर लिहिलं होतं की, ‘चांगले, कठीण वार मन प्रसन्न ठेवतं…’ सध्या सर्वत्र बिग बी यांच्या ब्लॉगची चर्चा आहे…