‘कांतारा’ पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताची अशी झाली होती अवस्था; म्हणाले ‘तिला काही दिवस…’
ऋषभ शेट्टी आणि चालुवे गौडा यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 17' मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अमिताभ बच्चन आणि ऋषभने अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यावेळी बिग बींनी त्यांची मुलगी श्वेता बच्चनची 'कांतारा' पाहून काय अवस्था झाली होती हे देखील सांगितलं.

अमिताभ बच्चन-होस्ट केलेल्या “कौन बनेगा करोडपती १७” या क्विझ शोच्या मंचावर ऋषभ शेट्टी आणि चालुवे गौडा उपस्थित होते. केवळ ऋषभ शेट्टीच नाही तर अमिताभ बच्चन यांनीही वैयक्तिक माहिती शेअर केली.
सुपरस्टार अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर 1’ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. कमाईच्या बाबतीत तर या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे लोक ऋषभ शेट्टीचे आणि त्याच्या या क्रिएटीव्हिटीचे कौतुक केलं आहे.
अमिताभ यांनी सांगितला त्यांच्या मुलीचा कांतारा पाहिल्यानंतरचा अनुभव
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऋषभ शेट्टी आणि चालुवे गौडा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती 17’ च्या मंचावर पोहोचले. या दरम्यान, केवळ ऋषभ शेट्टीच आणि अमिताभ बच्चन यांनीही एकमेकांशी अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या. यावेळी अमिताभ यांनी कांतारा पाहून त्यांची मुलगी श्वेताची अवस्था कशी झाली होती याबद्दल सांगितलं आहे.
ऋषभ हा सरासरीपेक्षा कमी दर्जाचा विद्यार्थी होता
ऋषभने अमिताभ यांच्यासोबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. त्याच्या बालपणीच्या गोष्टीही सांगितल्या, तो म्हणाला अभ्यासात तो फार हुशार नव्हता. “मी सरासरीपेक्षा कमी विद्यार्थी होतो. मी पाचवीत नापास झालो होतो,” पुढे त्याने सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबतच्या एका संस्मरणीय भेटीची आठवणही सांगितली, ज्याची त्याच्यावर खोलवर छाप पडली. ऋषभ पुढे म्हणाला, “चित्रपटानंतर ते मला भेटू इच्छित होते, पण मला माहित नव्हते. प्रोडक्शन हाऊसने मला अचानक सांगितले आणि मला वेष्टी म्हणजे तामिळनाडूमध्ये नेसले जाणारे धोतर घालण्याची संधीही मिळाली नाही. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा मला अजूनही पश्चात्ताप आहे की त्यांनी वेष्टी घातली होती आणि मी जीन्स घातली होती.”
ऋषभ जेव्हा पहिल्यांदा अमिताभ यांच्या घरी गेला होता
ऋषभने अमिताभ बच्चन यांच्या घरी एका बालचित्रपटाचे डबिंग करण्यासाठी गेले होते. ज्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला, तेव्हाची आठवणही त्याने सांगितली. तसेच ऋषभने अमिताभ यांच्या कलाकारांना पत्र लिहिण्याच्या सवयीचे कौतुक केले आणि म्हटले की, कधीतरी असे पत्र मिळणे हा सन्मान असेल.
अमिताभ यांनी सांगितली श्वेताची अवस्था
दरम्यान ऋषभने अमिताभ यांनी त्यालाही कौतुकाची थाप मिळणारे पत्र लिहावे अशी अपेक्षा व्यक्त करताच बिग बींनी प्रेमाने उत्तर दिले आणि म्हणाले, “सर्वप्रथम, तुमचे चित्रपट अजून पाहू शकलो नाही याबद्दल मी माफी मागतो… पण माझी मुलगी, श्वेता, कांतारा पाहायला गेली होती आणि तिला काही दिवस झोप लागली नाही. तिची झोप उडाली होती. तुमच्या अभिनयाने, विशेषतः शेवटच्या दृश्याने ती खूप प्रभावित झाली.” बिग बींनी ऋषभला असही सांगितलं की त्यांची मुलगी श्वेता बच्चन ‘कांतारा’ पाहिल्यानंतर खूप अस्वस्थ झाली होती.
