AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan | ‘जलसा’ बंगल्याबाहेर भेटायला येणाऱ्या चाहत्यांना बिग बींनी दिली ‘वॉर्निंग’!

गेल्या काही दिवसांपासून बिग बी हे त्यांच्या आगामी 'सेक्शन 84' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हा कोर्ट रुम ड्रामा असणार आहे. काही दिवसांपूर्वी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना मोठी दुखापत झाली होती.

Amitabh Bachchan | 'जलसा' बंगल्याबाहेर भेटायला येणाऱ्या चाहत्यांना बिग बींनी दिली 'वॉर्निंग'!
Amitabh BachchanImage Credit source: Twitter
| Updated on: May 07, 2023 | 4:37 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतात. कधी ब्लॉगद्वारे तर कधी ट्विट करत ते चाहत्यांना स्वत:विषयी अपडेट देत असतात. याशिवाय बिग बी दर रविवारी त्यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर जमलेल्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये त्यांना येत्या रविवारी चाहत्यांना बंगल्याबाहेर न येण्याची विनंती केली आहे. यामागचं कारणसुद्धा त्यांनी लिहिलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की येत्या रविवारी त्यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर गर्दी करू नका. कारण ते त्यांच्या चाहत्यांची भेट घेऊ शकणार नाहीत. शनिवारी रात्री त्यांनी हा ब्लॉग लिहिला आहे. ‘मी जलसाच्या गेटवर येऊ शकणार नाही. कारण मला काही काम आहे, जे पूर्ण करण्यासाठी मी रविवारचा दिवस निश्चित केला आहे. मी संध्याकाळी 5.45 पर्यंत परत येण्याचा प्रयत्न करेन. मात्र उशिरसुद्धा होऊ शकतो. म्हणून मी आधीच तुम्हाला कळवत आहे की कृपया गेटवर येऊ नका’, असं त्यांनी म्हटलंय.

गेल्या काही दिवसांपासून बिग बी हे त्यांच्या आगामी ‘सेक्शन 84’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हा कोर्ट रुम ड्रामा असणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना मोठी दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर ते बराच काळ घरी आराम करत होते. मात्र ब्लॉगद्वारे ते चाहत्यांना वेळोवेळी आपल्या तब्येतीचे अपडेट्स देत होते.

बरेच दिवसांनंतर ते निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांच्या अंत्यविधीला माध्यमांसमोर आले. पामेला यांच्या निधनानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. ‘त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला होता. चित्रपट निर्मिती, संगीतांच्या बैठका, घरातील आणि घराबाहेरील गेट टुगेदर.. सर्वकाही एका क्षणात निघून गेलं. एक एक करून सर्वजण सोडून जात आहेत. आपल्यामागे ते एकत्र घालवलेले सुंदर क्षण सोडून गेले आहेत’, असं बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. अमिताभ बच्चन हे मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह पामेला यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले होते. आयुष्य खूप कठीण आणि अंदाज न लावता येण्यासारखं आहे, असंही बिग बी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणाले होते.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.