AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘असे नागरिक देशाची गरज आहे…’, अमिताभ बच्चन यांच्या नातीने असं काय केलं, ज्यामुळे नव्याचं होतंय कौतुक

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा खास व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल... सध्या सर्वत्र नव्या नवेली नंदा हिच्या व्हिडीओची चर्चा..

'असे नागरिक देशाची गरज आहे...', अमिताभ बच्चन यांच्या नातीने असं काय केलं, ज्यामुळे नव्याचं होतंय कौतुक
| Updated on: Jun 20, 2023 | 4:57 PM
Share

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा हिची. नव्या एक प्रसिद्ध स्टारकिड आहे. नव्या कायम तिच्या खासगी आणि साध्या राहणीमानामुळे चर्चेत असते. नव्याला अनेकदा अत्यंत साध्या लूकमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. नव्याचा साधेपणा आणि समजूतदारपणा नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतही दिसून आला. या मुलाखतीत नव्या हिची हिंदी भाषेवर असलेली पकड पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्येकजण नव्याचं कौतुक करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नव्या भविष्याबद्दल बोलताना दिसत आहे.

नव्या म्हणाली, ‘मी कायम ऐकते की तुम्ही तरुण आहात तुमच्याकडे अनुभव नाही. तर तुम्ही कसं एखाद्या गोष्टीसाठी आणि एखाद्या क्षेत्रात काम करु शकता. तुम्हाला वैद्यकीय सेवा, कायदेशीर जागरूकता आणि घरगुती हिंसाचार याविषयी माहिती आहे का? पण माझे विचार वेगळे आहेत, जर एखादी गोष्ट करण्यासाठी मी ८० वर्षांपर्यंत थांबली तर देशाचं काय होईल. आमच्या पिढीचं काय होणार. आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे आणि देशातील 80 टक्के लोक आपल्याच वयाचे आहेत… असं नव्या म्हणाली..

नव्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र नव्याची चर्चा होत आहे.. नव्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, ‘इतका चांगला विचार करणारी पहिली स्टारकिड’, तर दुसरा युजर म्हणाला, ‘असे नागरिक देशाची गरज आहे…’

View this post on Instagram

A post shared by Supriya Paul (@supriyapaul)

नव्या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांची मुलगी आहे. श्वेता बच्चन यांनी १९९७ साली उद्योजक निखील नंदा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. नव्या आणि अगस्त्य. अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘द अर्चिज’ सिनेमातून बिग बींचा नातू अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

‘द अर्चिज’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान देखील झळकणार आहेत. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शि होणार आहे. सध्या सर्वत्र स्टारकिड्सच्या सिनेमाची चर्चा रंगत आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.