
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रा पार देखील फार मोठी आहे. म्हणून अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काही जरी कळंल तरी चाहते चिंता व्यक्त करतात. आता देखील बिग बी यांच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा वाढवण्यानंतर अमिताभच्या घराबाहेर 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर पोलिस सुरक्षा का वाढवण्यात आली आहे, याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. कारण पोलिसांनी गुपित ठेवलं आहे… असं देखील सांगण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर पोलिस सुरक्षेसह रस्त्यावर बॅरिकेडिंग पण करण्यात आलं आहे.
रविवारी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर बिग बींच्या चाहत्यांची मोठी गर्दी असते, त्यामुळे पोलिसांनी रविवारी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला होता… असं सांगण्यात येत आहे… पोलिसांनी सुरक्षा वाढवल्यामुळे बिग बी चर्चेत आहेत. पण त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, रविवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2025 सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयामुळे भरतात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे… आता सामान्य जनतेसोबतच सेलिब्रिटी देखील भारताच्या लेकींचं कौतुक करत आहेत.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील भारताच्या लेकींचं कौतुक केलं. एक्सवर खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जिंकलो… इंडिया वुमन क्रिकेट… विश्व विजेते… आम्हाला तुमचा अभिमान वाटावा असं तुम्ही काम केलं आहे… शुभेच्छा… शुभेच्छा… शुभेच्छा…’ सध्या देशात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे.
T 5552 – जीत गये !!! 🇮🇳🇮🇳
India Women Cricket .. WORLD CHAMPIONS !!
So much pride you have brought for us all ..
CONGRATULATIONS CONGRATULATIONS CONGRATULATIONS !!!!
💃🏻💃🏻🕺👏💪— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 3, 2025
भारताने 299 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 246 रन्सवर रोखलं. भारत यासह वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला. दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे.