अनुष्का शर्माने तिच्या फेव्हरेट पदार्थाचे नाव सांगताच अमिताभ बच्चन यांनी केलं तोंड वाकडं; म्हणाले ‘हे कसं खाऊ शकता?’

अनुष्का शर्माचा एक जुना KBC चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये अनुष्का तिच्या आवडीच्या भाज्यांबद्दल, पदार्थांबद्दल सांगितलं आहे. पण तिने सांगितलेल्या भाज्यांची नावे ऐकताच अमिताभ बच्चन यांनी तोंडच वाकडं केलं. आणि तिला म्हणाले "असं कसं खाऊ शकता तुम्ही हे?..." हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

अनुष्का शर्माने तिच्या फेव्हरेट पदार्थाचे नाव सांगताच अमिताभ बच्चन यांनी केलं तोंड वाकडं; म्हणाले हे कसं खाऊ शकता?
Amitabh Bachchan's mouth twisted when Anushka Sharma named her favorite food and vegetables
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 17, 2025 | 7:25 PM

सेलिब्रेटी त्यांच्या आहाराबाबत फार काटेकोरपणे नियम पाळत असतात. अनेक प्रकारचे डाएट फॉलो करत असतात. चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकाराच्या डाएटबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता असते. तसेच सेलिब्रेटी देखील अनेकदा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात किंवा मुलाखतीत त्यांच्या आहाराबद्दल सांगतच असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे अभनेत्री अनुष्का शर्माचा. तिचा हा व्हिडीओ आहे केबीसी शोमधला.

केबीसी शोमधील अनुष्का शर्माचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिथे ती अमिताभ बच्चन यांना तिच्या जेवणाच्या आवडी सांगताना दिसत आहे. तसेच तिला सर्वात जास्त काय आवडते याबद्दल ही सांगते. पण तिच्या भाजीच्या आवडी ऐकून अमिताभ बच्चन मात्र आश्चर्यचकित होतात. म्हणाले, “मला वाटते की ते तुम्हाला कसे सहन करतात हे मला दुसऱ्याकडून शोधून काढावे लागेल.”

अनुष्का शर्माला आवडतात या भाज्या

KBC चा एक जुना व्हिडिओ latikaasfoodvoyage नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तिचा वरुण धवनसोबत आली होती. जेव्हा अमिताभ बच्चन यांनी तिला तिच्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की तिला फणस आवडते, पण ती ते फळ म्हणून नाही तर भाजी म्हणून खाते.


अमिताभ बच्चन यांनी भाज्यांची नावे ऐकताच तोंड वाकडं केलं

त्यावर अमिताभ बच्चन विचारतात, “तुम्ही फणस, भोपळा यासारख्या गोष्टी कशा खाऊ शकता?” असं म्हणत त्यांनी तोंडही वाकडं केलेलं दिसत आहे. कारण या भाज्या त्यांना अजिबात आवडत नसल्याचं बिग बींनी सांगितलं. त्यावर अनुष्का उत्तर देते, “तिघेही माझे आवडते आहेत.” मग अमिताभ बच्चन म्हणतात, “मला वाटते की मला दुसऱ्याला विचारावे लागेल की ते तुम्हाला कसे सहन करतात.” अनुष्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा वेगाने व्हायरल होत आहे, त्याला हजारो लाईक्स मिळत आहेत.

अनुष्का शर्माच्या कामाबद्दल 

अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती जवळजवळ 7 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ होता जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून तिचा एकही चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला नाही. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपटही तयार आहे, पण सध्या ती तिच्या मुलांसोबत तिचा वेळ घालवताना दिसत आहे. तसेच ती तिच्या कुटुंबासह लंडनला स्थलांतरित झाली आहे. जिथे ती एका सामान्य आईप्रमाणे तिची मुलगी वामिका आणि मुलगा अकेय यांची पूर्ण काळजी घेताना दिसत आहे. विराट कोहलीनेही टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो भारतीय संघासाठी फक्त वनडे मॅचमध्ये खेळताना दिसतो.