AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या 2 सुपरस्टारसोबत अभिषेकचे पोस्टर, बिग बींनी शेअर केली विचित्र पोस्ट, म्हणाले- ‘मोठे लोक…’

अमिताभ बच्चन अनेकदा सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर विचित्र पोस्ट शेअर करत असतात. पुन्हा एकदा त्यांनी विचित्र पोस्ट करून लोकांना थक्क केले आहे. बिग बींनी आपला मुलगा अभिषेक, शाहरुख आणि अक्षय कुमार यांच्या होर्डिंगबाबत ही पोस्ट लिहिली आहे.

त्या 2 सुपरस्टारसोबत अभिषेकचे पोस्टर, बिग बींनी शेअर केली विचित्र पोस्ट, म्हणाले- ‘मोठे लोक...’
amitabh-bachchanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 16, 2025 | 5:50 PM
Share

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे क्रिप्टिक पोस्टचेही शहेनशाह आहेत. ते दररोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर क्रिप्टिक पोस्ट करून लोकांमध्ये खळबळ माजवतात. पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांनी एक्सवर क्रिप्टिक पोस्ट करण्यास सुरुवात केली असून लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टचा अर्थ समजण्यासाठी लोकांना वेळ लागतो. कारण त्यांची प्रत्येक पोस्ट ही गुंतागुंतीची असते. अमिताभ बच्चन यांनी नुकताच केलेल्या पोस्टमध्ये त्यांचा मुलगा अभिषेक, रोमान्सचा बादशाह शाहरुख खान आणि अक्षय कुमारही दिसत आहेत. आता नेमकी त्यांची काय पोस्ट आहे? वाचा…

काय आहे पोस्ट?

बिग बी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, T 5566 मोठ्या मोठ्या लोकांसोबत, पोस्टरवर आपलाही फोटो छापला जाते, माहीत आहे. या ट्वीटसोबत त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड्सचे होर्डिंग शेअर केले आहेत. होर्डिंगमध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अभिषेक बच्चन दिसत आहेत. तर तिसऱ्या फोटोत अमिताभ बच्चन स्वतःच्या होर्डिंगसमोर उभे दिसत आहेत.

चाहत्यांनी बिग बींच्या पोस्टवर दिल्या विचित्र प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्याचा वेगवेगळा अर्थ काढला आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, ‘मोठा झाला तर काय झाले जसं खजूराचं झाड, पक्ष्यांना सावली मिळत नाही फळं मात्र मिळतात. इतका मोठा होऊनही स्वतःला लहान समजणे हे फक्त तुमच्यासारखे महान व्यक्तीच करू शकतात. तुम्हाला नमस्कार सर. काळजी वाटते की भविष्यातही असे आदर्श पाहायला मिळतील का.’

दुसऱ्या चाहत्याने बॉलिवूडच्या शहेनशाहांच्या पोस्टवर लिहिले की, नात्यात तर आम्ही तुमचे बाप आहात आणि नाव आहे शहेनशाह. एका नेटिझनने लिहिले, ‘सर, तुम्ही आमच्यासाठी फक्त एका पोस्टरपेक्षा खूप जास्त आहात. तुम्ही 70 च्या दशकापासून भारतीय मध्यमवर्गासाठी मानवी भावनांचे चालते-फिरते विश्वविद्यालय आहात. तुमच आवाज, तुमच्या भूमिका, तुमचा प्रवास, सर्व काहीने आम्हाला असे घडवले आहे जे शब्दांत सांगणे कठीण आहे. तुमचा भारतीय पिढ्यांवर प्रभाव खूप मोठा आहे, आणि तो आमच्या हृदयात वसलेला आहे, होर्डिंग्सवर नाही.’

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.