AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चनशी का केलं लग्न? KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा

'जयाशी लग्न करण्यामागे फक्त प्रेमच कारण नव्हतं तर..'; 49 वर्षांनंतर बिग बींचा खुलासा

जया बच्चनशी का केलं लग्न? KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नातील काही खास क्षणImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2022 | 12:14 PM
Share

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या चौदाव्या सिझनचं सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये अनेकदा स्पर्धकांसोबत ते त्यांच्या खासगी आयुष्याविषयीचे विविध किस्से सांगतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जेव्हा बिग बींसमोर एक स्पर्धक येऊन बसली, तेव्हा त्यांना काही जुने किस्से आठवले. यावेळी त्यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न करण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं.

सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘केबीसी 14’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या शोच्या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये बिग बी हे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाच्या केसांची प्रशंसा करताना दिसतात. या स्पर्धकाने केस बांधलेले असतात, मात्र बिग बींच्या विनंतीनंतर त्या केस सोडतात आणि एक बट खांद्यापुढे घेतात.

हे पाहून अमिताभ बच्चन म्हणतात, “मी माझ्या पत्नीशी याच एका कारणासाठी लग्न केलं होतं, कारण तिचे केस खूप लांब होते.” जया आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट 1971 मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.

जंजीर, अभिमान, चुपके चुपके, शोले, कभी खुशी कभी गम, सिलसिला यांसारख्या चित्रपटांमध्ये ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकली. पहिल्या भेटीच्या दोन वर्षांनंतर 3 जून 1973 रोजी जया आणि बिग बींनी लग्न केलं. या दोघांना अभिषेक हा मुलगा आणि श्वेता ही मुलगी आहे. श्वेता ही व्यावसायिक आणि लेखिका आहे.

एखादा चित्रपट हिट झाला तर दोघं एकत्र फिरायला जाऊ असं बिग बी आणि जया यांनी लग्नापूर्वी ठरवलं होतं. मात्र एकत्र फिरायला जायचं असेल तर आधी लग्न करावं लागेल, अशी अट अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी घातली होती. अखेर एकत्र फिरायला जाण्यासाठी जया आणि अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या ठरलेल्या तारखेआधीच लग्नगाठ बांधली होती.

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...