KBC 18 : अमिताभ बच्चन यांच्यासमोरच त्यांच्या चित्रपटाला म्हणाली ‘बोअर’ ; KBC कंटेस्टंटच्या खुलाशाने बिग बीही हैराण

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो लोकांना खूप आवडतो. शोमध्ये अलीकडेच एक कंटेस्टंट आली ज्यांनी बिग बीं समोर काहीतरी असं सांगितलं ज्याची त्यांना अपेक्षा नव्हती.

KBC 18 : अमिताभ बच्चन यांच्यासमोरच त्यांच्या चित्रपटाला म्हणाली ‘बोअर’ ; KBC कंटेस्टंटच्या खुलाशाने बिग बीही हैराण
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 3:56 PM

बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय अभिनेते, शहेनशा, अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सध्या कौन बनेगा करोडपती (KBC) चा ऍ8 वा सीझन होस्ट करत आहेत. त्यांचा हा शो प्रेक्षकांना खूप आवडतो. या शोदरम्यान अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारपतात, गप्पा मारत त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेत असतात. एवढंच नव्हे तर कधीकधी ते त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दलही किस्से शेअर करतात. आता असा एक किस्सा नुकताच घडला, ज्यात केबीसीमध्ये आलेल्या स्पर्धकाने खुद्द अमिताभ यांच्यासमोरच खुलासा केला की त्यांचा ‘ मृत्यूदाता ‘ हा चित्रपट पाहून मी झोपले.

हो, हे खरं आहे. जयपूरहून एक स्पर्धक केबीसीमध्ये सहभागी झाली, तिचं नाव अलमस खान. तिने बिग बीं समोर अनेक आठवणी शेअर केल्या. चिक्पपट पहायला खूप आवडतं असं नमूद करत पुढे तिने 1997 साली आलेल्या मृत्यूदाता चित्रपटचाशी निगडीत किस्सा सांगितला. ती म्हणाली, मी तेव्हा खूप लहान होते आणि भावडांसोबत पिक्चर पहायवा गेले. मात्र तो पिक्चर पाहून मी थिएटरमध्येच झोपले, असा मोठा खुलासा तिने केला.

Loading...

बिग बींचा चित्रपट पाहून लागली झोप

अलमसने अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना सांगितलं की, ‘ तो चित्रपट तर मला समजला नाही इतका. पण जागा इतकी सुंदर होती आणि AC चालू होता की मला झोप आली. पण खरी गंमत म्हणजे जेव्हा माझे डोळे उघडले , तेव्हा फिल्म संपली होती आणि तुमचं गाणं चालू होतं’ असा किस्सा तिने सर्वांसमोर सांगितला.

किस्सा ऐकून बिग बी म्हणाले…

यानंतर ती पुढे म्हणाली की, ‘मृत्युदाता’ हा मी मोठ्या पडद्यावर पाहिलेला पहिला चित्रपट होता. हे ऐकून बिग बी थोडे निराश झाले , पण पुढे ते मजेशीर अंदाजात म्हणाले, “ एक मिनिट थांबा, झोपून कसा पिक्चर पाहिला तुम्ही? चित्रपट तर संपून गेला, मग काय पाहिलं तुम्ही?” असा मजेशीर प्रश्न त्यांनी विचारला.

1997 साली रिलीज झालेला ‘मृत्युदाता’ हा एक ॲक्शन-ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. मेहुल कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बी यांनी पाच वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. त्यांच्यासोबत डिंपल कपाड़िया, करिश्मा कपूर, अरबाज अली खान आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र या चित्रपटाला बरेच निगेटीव्ह रिव्ह्यू मिळाले.

केबीसीचा सध्या 18 वा सीझन सुरू असून सोमवार ते शुक्रवारी रोज रात्री 9 वाजता तो सोनी टीव्हीवर प्रसारित होतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us