मेहुणीच्या लग्नात अमिताभ बच्चन यांच्यासाठी लाठीचार्ज, सासऱ्यांनी नाही घेतलं घरात, तेव्हा नक्की काय झालेलं?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना सासऱ्यांनी का नव्हतं घेतलं घरात, बिग बींना पाहाताच पोलिसांकडून लाठीचार्ज, मेहुणीच्या लग्नात असं घडलं तरी काय होतं?

मेहुणीच्या लग्नात अमिताभ बच्चन यांच्यासाठी लाठीचार्ज, सासऱ्यांनी नाही घेतलं घरात, तेव्हा नक्की काय झालेलं?
फाईल फोटो
| Updated on: Nov 05, 2025 | 2:30 PM

Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांचे पत्नी जया बच्चन यांच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध आहेत. लग्नानंतर जया बच्चन यांच्या कुटुंबातील चांगल्या – वाईट परिस्थितीत बिग बी काम त्यांच्यासोबत असतात. एकदा खुद्द जया बच्चन यांचे वडील तरुण कुमार भादुरी यांनी मोठा खुलासा केलेला. सांगायचं झालं तर, 1973 मध्ये दोन्ही कुटुंबियांच्या मदतीने जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न केलं. लग्नानंतर जया बच्चन यांच्या वडिलांनी भोपाळ येथे रिसेप्शन पार्टी ठेवली होती. तेव्हा बिग बी प्रसिद्धी झोतात आलेले नव्हते… पण लग्नानंतर काही महिन्यांनी बिग बी सासरी गेले तेव्हा पोलिसांना त्यांच्यासाठी लाठीचार्ज करावा लागलेला..

तरुण कुमार भादुरी यांनी याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, ‘फेब्रुवारी 1979 मध्ये जेव्हा माझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न होतं. तेव्हा अमित यांनी लग्नाची शोभा वाढवली… त्यांनी ढोल वाजवलेला… नाचले, गायल होते… एवढंच नाही तर, लग्न समारंभात त्यांनी पाहुण्यांना आदराने जेवण देखील वाढलं होतं. त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली होती आणि खूप रसगुल्ले देखील खाल्ले होते… ‘

पोलिसांना करावा लागलेला लाठीचार्ज

जया बच्चन यांचे वडील म्हणालेले, ‘जया आणि अमिताभ बच्चन जेव्हा एकत्र मला भेटण्यासाठी आलेले तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. 1979 मध्ये बिग बी जेव्हा माझ्या लहान मुलीच्या लग्नात लखनऊ येथे आलेले तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागलेला आणि तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. तेव्हा इच्छा नसताना मला अमिताभ बच्चन यांना एका हॉटेलमध्ये थांबण्याची विनंती करावी लागली…’

जावयाचं कौतुक करत तरुण कुमार भादुरी म्हणालेले, ‘मोठे अभिनेते असून देखील सकाळी लवकर उठतात आणि पूजा पाठ करतात. गाणी ऐकायला त्यांना प्रचंड आवडतं… त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारची पुस्तकं आहेत… त्यांना वाचायला प्रचंड आवडतं… शिवाय ते खूप वक्तशीर देखील आहेत.’ असं देखील जया बच्चन याचे वडील तरुण कुमार भादुरी म्हणाले होते.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज त्यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. आज वयाच्या 83 व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. चाहते आगही त्यांच्य आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात. सोशल मीडियावर देखील बिग बी कायम सक्रिय असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.