AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडरवर्ल्ड डॉनमुळे अमिताभ बच्चन यांच्या ऑनस्क्रिन बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त, अचानक गायब झाली आणि…

पहिल्या नवऱ्याला सोडून अंडरवर्ल्ड डॉनसोबत राहू लागली अमिताभ बच्चन यांच्या ऑस्क्रिन बहीण, पण असं काय झालं ज्यामुळे अचानक गायब झाली प्रसिद्ध अभिनेत्री, तिची कोट्यवधींची संपत्ती देखील...

अंडरवर्ल्ड डॉनमुळे अमिताभ बच्चन यांच्या ऑनस्क्रिन बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त, अचानक गायब झाली आणि...
फाईल फोटो
| Updated on: Jul 16, 2025 | 12:19 PM
Share

एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक अभिनेत्रींचं आयुष्य देखील अंडरवर्ल्ड डॉनमुळे उद्ध्वस्त झालं. आज त्या अभिनेत्री कुठे आहेत आणि कसं आयुष्य जगतात… याबद्दल कोणालाच माहिती नाही. आज अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ जी बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अचानक गायब झाली आणि त्यानंतर कधी समोर आलीच नाही. अभिनेत्रीचे वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक होते. अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहिणीची देखील भूमिका साकारली होती. 40 पेक्षा जास्त सिनेमात काम करणारी ती अभिनेत्री डॉनच्या प्रेमात पडली आणि सर्वकाही संपलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री हिना कौसर आहे. हिना कौसर ही ‘मुगल ए आजम’ सिनेमाचे दिग्दर्शक असिफ यांची मुलगा आहे. हिना आणि अमिताभ बच्चन यांचा ‘बहना ओ बहना’ गाणं हीट ठरलं. याशिवाय हिना हिने नागिन धर्मकांटा, कालिया आणि निकाह या सिनेमांमध्ये देखील काम केलं. पण अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली नाही.

हिना हिला वडिलांमुळे अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण खासगी आयुष्यामुळे हिना तुफान चर्चेत राहिली. रिपोर्टनुसार, हिने हिने गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत लग्न केलं. इक्बाल मिर्ची याच्यासोबत अभिनेत्रीचं दुसरं लग्न होतं. 1991 मध्ये हिने हिने इक्बाल मिर्ची याच्यासोबत दुसरं लग्न केलं.

इक्बाल मिर्ची याच्यासोबत लग्न केल्यानंतर हिना हिने बॉलिवूडचा निरोप घेतल आणि लंडन येथे शिफ्ट झाली. 2013 मध्ये इक्बाल याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. एवढंच नाही तर, मुल नसल्यामुळे दुसऱ्या नवऱ्याच्या निधनानंतर हिना पूर्णपणे एकटी पडली.

2012 मध्ये, हिनाशी संबंधित बातम्या आल्या जेव्हा इक्बाल मिर्चीचे मुंबईतील दोन फ्लॅट नार्कोटिक्स विभागाने सील केले होते. ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. पण, तिच्या पतीच्या मृत्यूनंतरही, हिना कौसरने परदेशात राहण्याचा निर्णय घेतला.  गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.