AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांच्या भूमिका; या दिग्गज व्यक्तीने दिलं प्रशिक्षण

'राजा शिवाजी' या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांनी भूमिका साकारल्या आहेत. कॅमेरासमोरच्या या पहिल्यावहिल्या अनुभवाचं प्रशिक्षण देण्यासाठी रितेशने एका खास व्यक्तीची निवड केली होती.

'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांच्या भूमिका; या दिग्गज व्यक्तीने दिलं प्रशिक्षण
रियान आणि राहील देशमुखImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2026 | 8:35 AM
Share

अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ट्रेलरमधल्या एका दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं, ज्यामध्ये रितेशचा छोटा मुलगा बाल शिवरायांच्या भूमिकेत झळकला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पटकथालेखक आणि अभिनेते अमोल गुप्ते यांनी खुलासा केला की रितेशचा एकच मुलगा नाही तर दोन्ही मुलं वेगवेगळ्या टप्प्यातील छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर साकारणार आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याविषयी अमोल गुप्ते मोकळेपणे व्यक्त झाले. विशेष म्हणजे त्यांनीच राहील आणि रियान या दोन्ही मुलांना भूमिकेसाठी तयार केलं होतं.

रितेश आणि जिनिलिया यांचा मोठा मुलगा रियान देशमुख हा 11 वर्षांचा आहे तर छोटा मुलगा राहील हा 9 वर्षांचा आहे. ‘राजा शिवाजी’मध्ये हे दोघं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या विविध टप्प्यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अमोल गुप्ते यांनीच या दोघांना कॅमेरासमोरच्या त्यांच्या पहिल्या अनुभवासाठी तयार केलं.

‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि अभिनेते अमोल गुप्ते म्हणाले, “रितेश आणि जिनिलिया हे माझे कौटुंबिक मित्र आहेत. ‘स्टॅनली का डब्बा’ या माझ्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ते आघाडीवर होते. त्यांच्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवणं हा एक निव्वळ आनंद देणारा अनुभव होता. त्या दोघांनाही गणपती स्तोत्र आणि अनेक आरत्या तोंडपाठ आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारा चिमुकला राहिल आहे, तर आणखी थोड्या मोठ्या वयातील महाराजांच्या भूमिकेत रियान दिसणार आहे. मी त्यांना प्रशिक्षण दिलं, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरेल. कारण मला त्या दोघांशी संवाद साधताना खूप मजा आली आणि आता ते माझे पक्के मित्र बनले आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

“त्यांच्या स्क्रिप्टचा जो भाग मला दिला जायचा, त्यावर आम्ही फक्त गंमत म्हणून बोलायचो. ते कसं बोलायचं याबद्दल मी त्यांना टिप्स द्यायचो. ते पटकन शिकून घ्यायचे आणि प्रत्येक शनिवारी मी त्यांना भेटण्यासाठी खूप आतूर असायचो. आमचं नातं अजिबात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसारखं नव्हतं. तर समोसे आणि जिलेबी खाताना फ्रॉगी अंकलसोबत जमलेलं ते एक नातं होतं. ते दोघंही ‘हिरे’ आहेत. कॅमेरा अँगल, मार्किंग यांसारख्या निर्मितीच्या तांत्रिक बाबी मात्र रितेशने स्वत:च हाताळल्या होत्या. आमची मैत्री आयुष्यभर टिकेल, अशी मला आशा आहे. रितेशने एकेदिवशी अचानक मला विचारलं की चित्रपटात विजापूरचा सातवा सुलतान आदिल शाह तुम्ही साकारणार का? मी जराही संकोच न करता होकार दिला. कारण मी रितेश आणि जिनिलिया यांना नकार देऊ शकत नाही आणि शिवाय ती उत्तम भूमिका होती”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.