AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य

Amrish Puri and Govinda: शूटिंगला नऊ तास उशिरा आल्याने अभिनेते अमरिश पुरी यांनी गोविंदाच्या कानशिलात लगावल्याचा प्रसंग आजवर अनेकदा चर्चेत आला. आता अमरिश पुरी यांच्या मुलाने या प्रसंगावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
अमरिश पुरी, गोविंदाImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2026 | 10:42 AM
Share

बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे गोविंदा आणि अमरीश पुरी. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि पडद्यावर त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली. मात्र त्यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून एक किस्सा चर्चेत आहे. गोविंदा शूटिंगला तब्बल नऊ तास उशिरा पोहोचल्याने अमरीश पुरी संतापले आणि त्यांनी गोविंदाच्या कानशिलात लगावली, अशी चर्चा होती. आता या जुन्या दाव्यावर अमरीश पुरी यांचा मुलगा राजीव पुरीने मौन सोडलं आहे. विकी लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये राजीव पुरीला या कथित ‘थप्पड’ प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्याने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. त्याच्या मते, अमरीश पुरी यांचा स्वभाव असा नव्हता की ते रागाच्या भरात एखाद्याला कानाखाली मारतील.

राजीवने सांगितलं की, त्याचे वडील सहजपणे आपला संयम गमावणारे व्यक्ती नव्हते. एखादी व्यक्ती वारंवार त्रास देत असेल तरच ते नाराजी व्यक्त करायचे. त्यामुळे गोविंदाला कानाखाली मारल्याची गोष्ट खरी नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याने स्वतःही हा किस्सा ऐकला आणि वाचला असल्याचं सांगितलं, पण आपल्या वडिलांना ओळखत असल्यामुळे त्याला या दाव्यावर विश्वास नाही.

गोविंदा आणि अमरीश पुरी यांनी 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो कैदी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं का, असा प्रश्न अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात होता. यावर राजीव म्हणाला, गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीचा माझ्या वडिलांच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. मात्र त्यामागे कानाखाली मारल्याचा प्रसंग होता, असं मी मानत नाहीत. कदाचित गोविंदालाही जाणवलं असेल की अमरीश पुरी यांच्यासोबत काम करताना वेळेचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच त्यांनी भविष्यात त्यांच्यासोबत काम केलं नसेल, असा अंदाज राजीवने व्यक्त केला.

राजीवने यावेळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. “माझ्या वडिलांच्या मनात कोणाबद्दलही सहजपणे नकारात्मकता किंवा राग राहायचा नाही. त्यामुळे गोविंदा आणि अमरीश पुरी यांच्यात काही गैरसमज झाले असतील, तरी त्यांनी ते मनात धरून ठेवले नसावेत,” असं राजीवने स्पष्ट केलं.

Follow Us
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...