
गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेनंतर आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. रिपोर्टनुसार, करीना कपूर आणि सैफचा मुलगा जेह याच्या खोलीत अचानक एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि घरातील मोलकरणीसोबत वाद घालू लागला. मोलकरणीने आरडाओरडा सुरू केल्यावर सैफही घटनास्थळी पोहोचला. सैफने चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने अभिनेत्याला जखमी केलं. आरोपीने सहा वार केल्यानंतर सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सैफ याला रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच कुटुंबियांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान देखील रुग्णालयात पोहोचले. पण सैफ याची विचारपूस करण्यासाठी अभिनेत्याची पहिली पत्नी अमृता सिंग रुग्णालयात पोहोचेल की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सैफ याच्यासोबत असलेले वाद विसरुन अमृता सैफ याला भेटीसाठी येऊ शकते… असं सांगण्यात येत आहे. पण असं करणं अमृता हिच्यासाठी फार कठीण असेल. कारण घटस्फोटानंतर सैफ आणि अमृता कधीच एकमेकांना भेटले नाहीत. अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफच्या बाजूने असं सांगण्यात आलं की, अमृताची वागणूक सैफ सोबत आणि त्याच्या कुटुंबाशी चांगली नव्हती. या कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
सैफ अली खान याने जेव्हा करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. तेव्हा अमृताने एक पत्र लिहिलं होतं. पत्रात अभिनेत्रीने दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्यानंतर सैफ आणि अमृताचा कधीच संपर्क झाला नाही. शिवाय करीना देखील कधीच अमृताला भेटली नाही. पण अमृताने कधीच सारा आणि इब्राहिम यांना त्यांच्या वडिलांपासून दूर ठेवलं नाही.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असतात. तेव्हा अमृता प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. तर सैफ स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. अशात दोघांमध्ये प्रेम बहरलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचं नातं सैफच्या आई शर्मिला टागोर यांना मान्य नव्हतं…