AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Price Today 24 February 2026 : आज तरी खरेदीचा योग आहे की नाही ? 10 ग्रॅम सोन्याचे दर काय ? पटपट घ्या जाणून

Gold- Silver Rate Today 24 February 2026 Latest News Updates in Marathi : सोन्या-चांदीचे भरभक्कम दर पाहात, ते खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागतोय. आठव्याच्या दुसऱ्या दिवशी बाजार उघडल्यावर MCX वर सोन्याचे भाव किती, आज सोनं खाली घसरलं की दर पुन्हा वर चढत आहेत? सविस्तर घ्या जाणून..

Gold-Silver Price Today 24 February 2026 : आज तरी खरेदीचा योग आहे की नाही ? 10 ग्रॅम सोन्याचे दर काय ?  पटपट घ्या जाणून
सोनं-चांदीचे दर
| Updated on: Feb 24, 2026 | 10:28 AM
Share

Gold-Silver Price Today : मंगळवरचा दिवस जनसामान्यांसाठी खास ठरताना दिसत आहे. मार्केट उघडताच सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण सोन्याची चमक थोडी फिकी पडली आहे. मजबूत अमेरिकन डॉलरच्या दबावामुळे दोन्ही मौल्यवान धातूंनी त्यांची चमक गमावली. टॅरिफी अनिश्चितता आणि अमेरिका-इराण तणाव यासारख्या घटकांनंतरही, बाजारावर डॉलरचा प्रभाव मजबूत राहिला. त्यामुळे सोनं आणि चांदीचेभाव वर न जाता, खाल घसरल्याचे पहायला मिळाले.

MCX वर काय परिस्थिती ?

MCX अर्थात मल्टी कमॉडिटी एक्सचें ऑफ इंडिया वर सोनं-चांदीची हालाल मंदावली. MCX गोल्ड एप्रिल फ्यूचर्स 0.50% पेक्षा जास्त घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी लाख 60 हजार 750 रुपये दर झाला. तर MCX सिल्व्हर एप्रिल फ्यूचर्स0.20 % घसरले आणि प्रती किलोसाठी दर 2 लाख 64 हजार 972 रुपये झाले. मंगळवारी सोन्याचा भाव सुमारे 700 रुपयांनी घसरला. मात्र, गेल्या व्यवहार सत्रात सोन्याचा भाव 3% वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 61हजार 500 रुपये झाला होता. तर चांदीचा भाव 5% वाढून प्रति किलो 2,65,279 रुपये इतका होता. .

किरकोळ विक्रीतही दिसून आली घट

बुलियन वेबसाइटनुसार, 24 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1190 रुपयांनी घसरून 1, 60,920 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव प्रति किलोसाठी 2,64,740 रुपये इतका होता, म्हणजेच चांदीच्या दरात 1930 रुपयांची घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती काय ?

24 फेब्रुवारी रोजी एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आला असला तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर हा धातू तेजस्वीपणे चमकताना दिसतोय. स्पॉट गोल्ड 1.49 टक्क्यांनी वाढून 5,183 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता, तर स्पॉट सिल्व्हर 3.21 टक्क्यांनी वाढून 87.3 डॉलर प्रति औंस असा व्यवहार करत होता.

डॉलर निर्देशांक सुमारे 0.20% वाढून 97.88 वर पोहोचला, ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी सोनं महाग झाल्याचं दिसून आलं.या कारणामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीवर परिणाम झाला आणि किमती घसरल्या. आता बाजार डॉलरच्या हालचाली आणि जागतिक भू-राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे, त्यामुळे येत्या काळात सोने आणि चांदीची दिशा निश्चित होईल.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......