सैफची एक्स वाईफ अमृताने मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून थक्क व्हाल
सैफची एक्स वाइफ अमृता सिंग आता तिच्या प्रॉपर्टीमुळे चर्चेत आली आहे. अमृताने मुंबईतील जुहू या सर्वात महागड्या एरियात फ्लॅट विकत घेतला आहे. ज्याची किंमत ही कोटींच्या घरात आहे. अमृताने घेतलेल्या या लक्झरिअस फ्लॅटची चर्चा होताना दिसत आहे.

सैफ अली खान, करिना खान तसेच त्यांची मूलं कायमच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतातच. पण सैफची एक्स वाईफ अमृता सिंग मात्र फार चर्चेत राहताना दिसत नाही. ती मीडियासमोरही फार कमी वेळा दिसते. पण आता मात्र अमृता एक गोष्टीसाठी नक्कीच चर्चेचा विषय बनली आहे. ते म्हणजे तिने घेतलेला फ्लॅट.
कोट्यावधींचा फ्लॅट विकत घेतला
बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग ही 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी होती. अमृताने मुंबईत नवीन एक आलिशान फ्लॅट घेतला आहे. मुंबईतील जुहू येथे अमृताने हा फ्लॅट विकत घेतला आहे. याची किंमत कोटींच्या घरात आहे. गेल्यावर्षीच अमृताने अंधेरीमध्ये 22.26 कोटींचे दोन ऑफिस खरेदी केले होते. त्यानंतर आता तिने जुहू येथे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे.
जुहू हा मुंबईतील सर्वात महागड्या एरियात घेतला फ्लॅट
जुहू हा मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित भागांपैकी एक आहे. इथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. वरुण धवन, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि शक्ति कपूर यांच्यासह अनेक कलाकारांची इथे आलिशान घरे आहेत.
फ्लॅटची किंमत ही तब्बल 18 कोटी
मीडिया रिपोर्टनुसार, अमृता सिंगने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत ही तब्बल 18 कोटी रुपये आहे. पेनिनसुला या बिल्डिंगमध्ये तिने हा फ्लॅट घेतला आहे. 2 हजार 712 स्क्वे. फूट परिसरात तिचा हा फ्लॅट पसरलेला असून याबरोबरच तिने तीन पार्किंगही खरेदी केल्या आहेत. यासाठी तिने 90 लाख रुपयांची स्टँम ड्युटी केली आहे. तर 30 हजार रजिस्ट्रेशन फी भरली आहे.
ब्रँड अडॉरसमेंटमधून पैसा कमावते अमृता
अमृता सिंग गेल्या कित्येक काळापासून चित्रपटांपासून लांब आहे. तरीही ती कोट्यावधींची मालकीण कशी असा प्रश्न चाहत्यांना बऱ्याचदा पडला होता. मात्र अमृता ब्रँड अडॉरसमेंटमधून पैसे कमवते. याशिवाय रिअल इस्टेटमधून ती मोठी कमाई करते. अनेक ठिकाणी तिने रिअल इस्टेटमधून गुंतवणूक केली आहे. ती जवळपास 50 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.