Amruta Fadnavis New Song: ‘वो तेरे प्यार का गम! पावसाचा दर्दी मौसम आणि अमृता फडणवीस यांच सॅड साँग; गाण्याची झलक पाहिलीत का?

अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांचं 'वो तेरे प्यार का गम! (Woh Tere Pyar Ka Gham ) हे  नवं सॅड साँग(New sad Song) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस यांनी याचं पोस्टर रिलीज केल्यानंतर या गाण्याची झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडिओ साँगमध्ये नेहमी प्रमाणे अमृता फडणवीस यांचा वेगळा लुक पहायाला मिळला आहे.

Amruta Fadnavis New Song: 'वो तेरे प्यार का गम! पावसाचा दर्दी मौसम आणि अमृता फडणवीस यांच सॅड साँग; गाण्याची झलक पाहिलीत का?
वनिता कांबळे

|

Jul 16, 2022 | 3:29 PM

पावसाळा म्हंटल की अलगच माहौल असतो. पावसाच्या या दर्दी मौसममध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांचं ‘वो तेरे प्यार का गम! (Woh Tere Pyar Ka Gham ) हे  नवं सॅड साँग(New sad Song) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीस यांनी याचं पोस्टर रिलीज केल्यानंतर या गाण्याची झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडिओ साँगमध्ये नेहमी प्रमाणे अमृता फडणवीस यांचा वेगळा लुक पहायाला मिळला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीस यांच हे पहिलंच गाणं असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली. गाण्याचा छोटासा व्हिडिओ शेअर करत लवकरच संपूर्ण गांण युट्यूब वर रिलीज होणार असल्याची घोषणा अमृता फडणवीस यांनी सोशल मिडीयावरील पोस्ट द्वारे केली आहे.

‘वो तेरे प्यार का गम’ असं अमृता फडणवीस यांच्या या नविन नवीन गाण्याचे नाव आहे. अमृता फडणवीस यांनी या गाण्याची एक झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर केला आहे. ‘लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना… लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना …!’असे कॅप्शन देत अमृता फडणवीस यांनी या गाण्याचे पोस्टर सोशल मिडीयवर शेअर केला आहे. यावेळी अमृता फडणवीस यांनी सारेगम या म्युझिक कंपनीचे आभार देखील मानले आहेत.

यानंतर आता अमृता फडणवीस यांनी या गाण्याची झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. 19 जुलै रोजी हे गाणं रिलीज होणार आहे. will be here to break our hearts all over again on असं कॅप्शन देत अमृता फडणवीस यांनी हा टिजर शेअर केला आहे.

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यातून गोल्डन मेलोडी पाहायला मिळणार आहे. माय लव्ह’ या 1970मध्ये आलेल्या सिनेमातील गाण  रिक्रिएट करत अमृता फडणवीस यांनी ते वेगळ्या अंदाजात आणले आहे. अभिनेते शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यवर हे  गाणं चित्रीत करण्यात आलं होते.

अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर, तर कधी कधी सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर  केली आहेत. अमृता फडणवीसांनी संगीत क्षेत्रातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  त्यांच्या गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांनी आपली गाण्याची आवड जपली आहे.  फॅशनच्या बाबतातही त्या आपल्या विशेष  व्यक्तिमत्व टिकवून आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें