AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई मला सुंदर बनव गं..; त्या घटनेनंतर अमृता सुभाष पूर्णपणे खचली, नेमकं काय घडलं?

अभिनेत्री अमृता सुभाषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा प्रसंग सांगितला. डान्स टीचरच्या त्या वागणुकीमुळे अमृताच्या आत्मविश्वासावर खूप परिणाम झाला होता. महिला सक्षमीकरणाच्या बाता करताना एक महिलाच दुसऱ्या महिलेला कमी लेखते, असं तिने म्हटलंय.

आई मला सुंदर बनव गं..; त्या घटनेनंतर अमृता सुभाष पूर्णपणे खचली, नेमकं काय घडलं?
Amruta SubhashImage Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2025 | 8:53 AM
Share

अभिनेत्री अमृता सुभाषने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलंय. विविध भूमिकांमधून तिने आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमृता तिच्या करिअरमधील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. कशा पद्धतीने एका डान्स टीचरने तिला तिच्या वर्णावरून ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यास नकार दिला होता, याविषयी तिने सांगितलं. “आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो, पण एक महिलाच दुसऱ्या महिलेला कमी लेखताना दिसते”, असं ती म्हणाली.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली, “मला लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती. मी हायस्कूलमध्ये असताना आमच्या डान्स टीचरने सर्व सुंदर विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी येऊन ऑडिशन देण्यास सांगितलं होतं. मी थेट माझ्या आईकडे गेले आणि मला सुंदर बनवण्यास सांगितलं. माझ्या टीचरने मला डान्स ग्रुपमध्ये सहभागी करण्यास नकार दिला होता, कारण माझा रंग त्यांना आवडला नव्हता. त्यांनी मला सांगितलं की तुझा रंग सावळा आहे आणि डोळे छोटे आहेत, म्हणून तुला ग्रुपमध्ये घेऊ शकत नाही. हे ऐकून मला धक्काच बसला होता. माझ्या रंगामुळे मला नाकारल्यामुळे मी माझ्या रंगाचाच द्वेष करू लागली होती. ही घटना जेव्हा मी माझ्या आईला सांगितली, तेव्हा तीसुद्धा खूप नाराज झाली होती.”

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

सावळ्या रंगाच्या न्यूनगंडातून बाहेर येण्यासाठी अमृताला बराच वेळ लागला होता. त्यानंतर जेव्हा कधी तिला चित्रपटांमधून नाकारलं जायचं, तेव्हा तिला तिच्या डान्स टीचरने म्हटलेली गोष्ट आठवायची. या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम अमृताच्या आत्मविश्वासावर झाला होता. फक्त गोरं असल्यानेच काम मिळतं, असं तिला वाटत होतं. परंतु हळूहळू जेव्हा गोष्टी बदलल्या आणि तिच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली, तेव्हा तिला तिच्यातील खऱ्या प्रतिक्षेची जाणीव झाली.

अमृताने ‘श्वास’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर 2013 मध्ये ‘अस्तू’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तिचे अनेक चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले गेले. अभिनयासोबतच अमृता उत्तम गायिकासुद्धा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.