अमिताभ यांनी सून ऐश्वर्यासाठी केलेलं ट्विट व्हायरल; ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब?
ऐश्वर्या राय बच्चनच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही सार्वजनिक शुभेच्छा न मिळाल्याने घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. मात्र, त्यातच आता अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्यासाठी केलेले एक ट्वीट व्हायरल झाले आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटावरून बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच सर्वांचे लक्ष हे ऐश्वर्याच्या वाढदिवसाकडे होतं. ऐश्वर्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबाकडून काही शुभेच्छा किंवा सेलिब्रेशन होणार का हे यासाठी सगळेच चाहते उत्सुक होते. मात्र यंदा ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून वाढदिवसाच्या कोणत्याही शुभेच्छा देण्यात आल्या नाही. पण यासर्वांमध्य़े अमिताभ यांनी सुनेसाठी केलेले एक ट्वीट आता व्हायरलं होतं आहे.
- Amitabh Bachchan on Aishwarya’s birthday
सून ऐश्वर्यासाठी केलेलं ट्विट व्हायरल
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने नुकताच तिचा 51वा वाढदिवस साजरा केला. पण तिच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबातील कुणीही सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या नसल्याचं पाहायला मिळालं. पण असं असलं तरीही काहीच दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला ऐश्वर्याने शुभेच्छा दिल्या होत्या. या सगळ्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा जास्तच जोर धरू लागली आहे.
- Amitabh Bachchan on Aishwarya’s birthday
ऐश्वर्याच्या वाढदिवासाला तिच्या लाखो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात. मात्र बच्चन कुटुंबाची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. पण सध्या सोशल मीडियावर अमिताभ यांचं एक ट्विट चांगलंच व्हायरल होतंय. रेडिटवर अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्यासाठी केलेलं एक जुन ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये बच्चन कुटुंबाने ऐश्वर्याचा वाढदिवस आनंदात साजरा केला असल्याचं समजतंय.
अमिताभ यांनी काय ट्विट केलं होतं
अमिताभ यांचं 2010 मधलं एक ट्विट सध्या व्हायरल होतंय. त्यामध्ये एका ट्विटमध्ये अमिताभ यांनी म्हटलंय की, “T172 -ऐश्वर्याला सगळ्यांनी तिच्या वाढदिवासाला खूप शुभेच्छा दिल्या, त्यासाठी मनापासून धन्यवाद..तिच्यापर्यंत सगळ्या शुभेच्छा पोहचवल्या आहेत आणि तिनेच सगळ्यांचे आभार मानलेत”. तसेच एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये अमिताभ यांनी ऐश्वर्याच्या बर्थडेचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं की “ताजमध्ये फॅमिली डिनरचं आयोजन केलं होतं. त्या दिवसामुळे खरंच खूप छान वाटलं”
- Amitabh Bachchan on Aishwarya’s birthday
या वर्षी ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा दिल्या गेल्या नसल्यानं अमिताभ यांनी बच्चन कुटुंबाच्या वतीने सुनेबद्दल प्रेमाने लिहिलेलं हे जूनं ट्विट सोशल मीडियावर व्हायरलं होतं आहे.
ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा नाहीत?
ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही शुभेच्छा मिळाल्या नसल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसलं. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटावर नेटकऱ्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही ऐश्वर्या आणि अभिषेकडून यावर अधिकृत असं भाष्य करण्यात आलेलं नाहीये.
