आलिया भट्टच्या कडेवर लेक राहा, ज्यूनियर कपूरला पाहाताच अनंत अंबानी यांची अशी प्रतिक्रिया

Anant Ambani and Radhika Merchant pre wedding : अनंत - राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात अलिया भट्टच्या लेकीचा बोलबाला, राहाला पाहताच अनंत अंबानी... व्हिडीओ व्हायरल... सध्या सर्वत्र राहा कपूर हिच्या व्हिडीओची चर्चा...

आलिया भट्टच्या कडेवर लेक राहा, ज्यूनियर कपूरला पाहाताच अनंत अंबानी यांची अशी प्रतिक्रिया
| Updated on: Mar 03, 2024 | 2:27 PM

मुंबई | 3 मार्च 2024 : देशाचे सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सध्या जामनगर याठिकाणी अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात सुरु आहे. कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर दोघे लेक राहा कपूर हिच्यासोबत उपस्थितीत राहिले आहेत. सोशल मीडियावर कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या सोशल मीडियावर आलिया, राहा आणि अनंत अंबानी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आलिया लेक राहा हिला कडेवर घेऊन फिरताना दिसत आहे. अशात राहाला समोर पाहाताच अनंत अंबानी आनंदी होतात आणि ज्यूनियर कपूरवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर तिघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर, चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत. एका नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘बॉलिवूडते सर्व सेलिब्रिटी एकीकडे तर, राहा एकीकडे..’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आई आणि लेक दोघी प्रचंड क्यूट दिसत आहेत.’

 

 

तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कोणीची नजर नको लागायला…’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते फक्त आलिया आणि तिच्या लेकीच नाहीतर, अनंत अंबानी यांचं देखील कौतुक करत आहेत. ‘अनंत किती प्रेमळ आहे…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अनंत अंबानी यांचं स्पीच ऐकून चांगलं वाटलं…’ अनंत आणि राधिका 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

राहा कपूर…

राहा कपूर हिचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. आलिया भट्ट हिने सोनोग्राफीचा एक फोटो पोस्ट करत प्रग्नेंट असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. एवढंच नाहीतर, 25 डिसेंबर 2023 मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लेकीचा चेहरा संपूर्ण जगाला दाखवला..

आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील आलिया कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.