AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकाचं प्री-वेडिंग, मुकेश अंबानींच्या संपत्तीतील केवळ इतके टक्के खर्च, पाहुण्यासाठी 2500 पेक्षा अधिक पदार्थ

Anant Ambani and Radhika Merchant pre wedding : लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश अंबानीच्या संपत्तीतील इतकेच टक्के पैसे खर्च, पाहुण्याच्या सोयीसाठी खास बेडरुम, 2500 पेक्षा अधिक पदार्थ आणि बरंच काही..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाची चर्चा...

लेकाचं प्री-वेडिंग, मुकेश अंबानींच्या संपत्तीतील केवळ इतके टक्के खर्च, पाहुण्यासाठी 2500 पेक्षा अधिक पदार्थ
| Updated on: Mar 03, 2024 | 1:29 PM
Share

मुंबई | 3 मार्च 2024 : देशाचे सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सध्या जामनगर याठिकाणी अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात सुरु आहे. आज कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. कार्यक्रमासाठी रिहान, जे ब्राऊन, ड्वेन ब्रावो, मार्क झुकरबर्ग, शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणबीर सिंग यांसारखे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.

अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये अंबानी कुटुंबाने गडगंज पैसा खर्च केला आहे. रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबाने प्री-वेडिंगसाठी तब्बल 1000 कोटी रुपये खर्च केले आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे मुकेश आणि नीता अंबानी यांनी सर्वात लहान मुलाच्या प्री-वेडिंगसाठी जे पैसे खर्च केले आहेत, ते मुकेश अंबानी यांच्या संपूर्ण संपत्तीतील फक्त 0.1% आहे. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सायना नेहवाल हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांनी पाहुण्यांच्या आरामासाठी केलेली व्यवस्था दिसत आहे. पाहुण्यांची संपूर्ण काळजी अंबानी कुटुंबियांनी घेतली आहे. सुंदर गार्डनमध्ये पाहुण्यांसाठी टेंट तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये लिव्हिंग रुम आणि बेडरुम खास प्रकारे सजवण्यात आला आहे.

पाहुण्यासाठी खास मेन्यू…

रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबियांनी पाहुण्यांच्या खाण्याची देखील उत्तम सोय केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाहुण्यासाठी 2500 पेक्षा अधिक पदार्थांची मेजवानी आहे. ज्यामध्ये जापानी, मॅक्सिकन, पारसी आणि पेन एशियन पदार्थांचा समावेश आहे. 70 पेक्षा अधिक पदार्थ नाश्तासाठी आहेत. 200 पेक्षा अधिक पदार्थ दुपारच्या जेवणासाठी आणि 275 पेक्षा अधिक पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी आहेत. एवढंच नाही तर, रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत 85 वेगवेगळ्या पदार्थांचं आयोजन करण्यात आलं आहे.

अनंत आणि राधिका यांचं नातं

रा धिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात राधिका – अनंत यांचा साखरपुडा झाला आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून राधिका – अनंत एकत्र आहेत. असं असताना देखील राधिक कधीच प्रसिद्धी झोतात आल्या नाहीत. 12 जुलै रोजी मुंबईत दोघेही लग्न करणार आहेत.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.