AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankit Mohan : एकेदिवशी मला न सांगता… प्रमोशनचा वाद अन् निर्मात्यांचे आरोप; अखेर अंकित मोहननं सोडलं मौन

Ankit Mohan Controversy : ‘देवघर ऑन रेंट’ हा सिनेमा काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला अंकित मोहननं हजेरी लावली नव्हती, असं निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सांगितलं. तसेच अभिनेत्यावर आरोपही केले. आता एका मुलाखतीत अंकितनं यावर मौन सोडलं असून त्याची बाजू मांडली आहे.

Ankit Mohan : एकेदिवशी मला न सांगता... प्रमोशनचा वाद अन् निर्मात्यांचे आरोप; अखेर अंकित मोहननं सोडलं मौन
| Updated on: Sep 29, 2026 | 9:33 PM
Share

‘देवघर ऑन रेंट’ हा सिनेमा २५ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालं. मात्र, ट्रेलर लॉन्चपासून या सिनेमाची चर्चा होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अंकित मोहनने सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला हजेरी लावली नाही. यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत आणि निर्मात्यांनी अंकित फोन उचलत नाही असंही सांगितलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत अंकित मोहननं या वादावर प्रतिक्रिया दिली असून आपली बाजू मांडली आहे.

सिनेमाच्या वादावर अंकित मोहननं सोडलं मौन

अंकित मोहन म्हणाला की, ‘दीड-दोन वर्षांपूर्वी दिग्दर्शकांनी मला‘देवघर ऑन रेंट’ सिनेमासाठी विचारलेलं. त्यांनी सिनेमाची संपूर्ण कथा सांगितलेली आणि त्यावेळी हा सिनेमा दोन हिरोंचा आहे, असंही सांगितलेलं. एक गँगस्टर आणि एक पोलिसाची भूमिका होती. त्यांनी मला पोलिसाच्या भूमिकेसाठी विचारलं. मी पोलिसांची भूमिका कधी साकारली नव्हती, त्यामुळे नवीन काहीतरी करण्याची संधी मिळाली. नंतर आमचं स्क्रिप्टचं वाचन झालं, लूक टेस्ट झाली. सगळं चांगलं होतं. मी त्यांच्यासाठी इतर प्रोजेक्ट्सना नकार दिला. मी १५ दिवसांचं शूटिंग करून सिनेमाचं शूटिंग केलंय. प्रोडक्शनमध्ये काही ना काही अडचणी असतातच. शूट झालं आणि मग मी माझ्या इतर कामांना लागलो.’

‘पण, एकेदिवशी मला न सांगता त्यांनी निखील चव्हाणचा प्रोमो टीझर शूट करून सिनेमाची घोषणा केली. मला थोडं विचित्र वाटलं. कारण, आधी मला त्यांनी सांगितलेलं की, माझ्या नावाने सिनेमाची घोषणा होईल. त्यानंतरही मी त्यांना याबद्दल विचारलं. पण, त्यांनी सगळ्या गोष्टी एकमेकांवर ढकलायला सुरुवात केली. दुसरा टीझर माझ्या नावाने येईल, असं सांगण्यात आलेलं. पण, तोही रिलीज नाही झालं. पोस्टरसाठीही माझे फोटो काढण्यात आले, पण तेसुद्धा त्यांनी शेअर केले नाहीत. हे सगळं २०२५ मध्ये झालं.’

‘त्यानंतर जानेवारीपासून मला चांगले सिनेमे मिळाले. मी जेव्हा आदिनाथसोबत वेब सीरिज शूट करत होतो, त्यावेळी त्यांनी मला फोन केला आणि अॅक्शन सीन शूट करायचाय असं सांगितलं. त्यावेळी मी त्यांना लगेच होकार दिला.मी दिग्दर्शकांना फोन करत होतो, मेसेज करत होतो. पण, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. महिन्याभराने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्या अॅक्शन सीनमधून मला काढण्यात आलं. मला सांगण्यात आलेलं एक आणि झालं भलतच. हा माझा सिनेमा आहे, असं मला वाटलंच नाही.’

निर्मात्यांनी अंकितवर फोन उचलत नसल्याचा आरोप केला होता. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला की, ‘त्यांनी मला दिलेलं वचन नाही पाळलं, तर मी का कमिटमेंट पाळायची? जर तुम्ही तुमचं वचन पाळलं असतं तर मीसुद्धा माझं वचन पाळलं असतं. मी कामात व्यग्र होतो. एखादा माणूस जर माझ्या नजरेतून उतरला तर तो कायमचा उतरला. मी त्यांना म्हटलं, जे काही बोलायचंय ते माझ्या टीमसोबत बोला. प्रोफेशनली सगळं करूया. प्रीमिअरच्या आधी त्यांनी मला लीगल नोटीस पाठवलेली. पण, तरीही मी प्रीमिअरला गेलेलो.’ ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अंकित मोहन बोलत होता.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप