रुग्णालयात दाखल असलेल्या अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट

अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयातील त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हारल... कशी आहे आता त्यांची प्रकृती?

रुग्णालयात दाखल असलेल्या अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट
रुग्णालयात दाखल असलेल्या अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 3:01 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्ही होस्ट अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अन्नू कपूर यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अन्नू कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अन्नू कपूर रुग्णालयातील स्टाफसोबत दिसत आहेत. फोटोमध्ये अन्नू कपूर आनंदी दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अन्नू कपूर यांची प्रकृती सुधारल्यामुळे कुटुंब आणि चाहत्यांची चिंता मिटली आहे.

काही दिवसांपूर्वी अचानक अन्नू कपूर यांची प्रकृती खालावली होती. छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टर अजय स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नू कपूर यांना २६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील कार्डियोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली अन्नू कपूर होते.

आता अन्नू कपूर यांची प्रकृती स्थिर आहे. जेव्हा अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. आता व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अन्नू कपूर यांची प्रकृती स्थिर दिसून येत आहे.

अन्नू कपूर 66 वर्षांचे आहेत. अन्नू कपूर हे रेडियो जॉकी, अभिनेते, गायक आणि टीव्ही होस्ट देखील आहेत. अन्नू कपूर यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय टीव्ही शोमध्ये देखील अन्नू कपूर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. अन्नू कपूर अभिनय विश्वात गेल्या ४ दशकांपासून काम करत आहेत.

आपल्या स्पष्ट स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या अन्नू कपूर यांना कोणत्याही मुद्द्यावर बोलायला आवडतं. अन्नू कपूर यांचा जन्म २० फेब्रुवारी १९५६ मध्ये झाला. अन्नू कपूर ५६ वर्षांचे आहेत. अन्नू कपूर यांनी महानायक अमिताभ बच्चन आणि शशि कपूर ‘काला पत्थर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अन्नू कपूर यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

अन्नू कपूर यांना 1984 साली प्रदर्शित झालेल्या ‘उत्सव’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘घायल’, ‘हम’ , ‘डर’ आणि ‘जॉली एलएलबी 2’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंज केलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.