AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satish Kaushik | मित्राला अखेर निरोप देताना ढसाढसा रडले अनुपम खेर; भावूक करणारा व्हिडीओ

अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी, सलमान खान यांसारख्या कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकलाकाराला अंतिम निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती. अभिनेता सलमान खानचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Satish Kaushik | मित्राला अखेर निरोप देताना ढसाढसा रडले अनुपम खेर; भावूक करणारा व्हिडीओ
Anupam Kher and Satish KaushikImage Credit source: Facebook
| Updated on: Mar 10, 2023 | 8:20 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शिक सतीश कौशिक पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी एकच गर्दी केली होती. सतीश कौशिक बुधवारी मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीला गेले होते. रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधी त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार्टर विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. अनुमप खेर, अनिल कपूर आणि सतीश कौशिक हे तिघेही जिगरी मित्र म्हणून ओळखले जातात. कौशिक यांच्या निधनाची वार्ता सर्वांत आधी अनुपम खेर यांना समजली. त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित सगळ्यांना कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.

अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची जवळपास 45 वर्षे जुनी मैत्री होती. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अनुपम खेर हे ॲम्ब्युलन्समध्ये कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा भावूक झाले आहेत.

अनुपम खेर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, जॉनी लिव्हर, जावेद अख्तर, बोनी कपूर, पंकज त्रिपाठी, सलमान खान यांसारख्या कलाकारांनी आपल्या लाडक्या सहकलाकाराला अंतिम निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती. अभिनेता सलमान खानचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अत्यंत भावूक दिसत आहे.

अनुपम खेर यांची पोस्ट

‘मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, याची मला जाणीव आहे. पण माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल हे लिहावं लागेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. 45 वर्षांच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम मिळाला. सतीशविना आयुष्य आधीसारखं कधीच नसेल,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

जावेद अख्तर यांची पोस्ट

‘प्रेम आणि विनोदाची ऊब असलेला सतीश गेल्या 40 वर्षांपासून माझ्या भावासारखा होता. तो माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान.. सतीशजी.. आता तुमची वेळ नव्हती’, अशा शब्दांत प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सतीश कौशिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील कॅलेंडर या त्यांच्या भूमिकेने त्यांना पहिल्यांदा लोकप्रियता मिळवून दिली. फक्त अभिनय क्षेत्रातच न रमता त्यांनी पटकथा लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही स्वत:ला आजमावून पाहिलं.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा