AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिरातील देणगी चोरी ही क्षुल्लक बाब..; अनुपम खेर यांच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी, ट्रोलर्सना दिलं प्रत्युत्तर

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राम मंदिरातील देणगीच्या चोरीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी खूप टीका केली होती. आता टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

राम मंदिरातील देणगी चोरी ही क्षुल्लक बाब..; अनुपम खेर यांच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी, ट्रोलर्सना दिलं प्रत्युत्तर
अनुपम खेर, राम मंदिरImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 12, 2026 | 3:53 PM
Share

राम मंदिरातील देणगी चोरीवर टिप्पणी केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. राम मंदिरातील चोरी ही एक किरकोळ गोष्ट आहे, असं ते म्हणाले होते. “मुघलांनी देशाकडून जे काही लुटलं त्याच्या तुलनेत दोन ते सात कोटी रुपयांची कथित अनियमितता काहीच नाही. मुघल नेत्यांनी फक्त पैसाच नाही तर हिंदूंचा सन्मानही लुटला आहे,” असं वक्तव्य अनुपम खेर यांनी केलं होतं. यामुळे त्यांना सोशल मीडियावर तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता अनुपम खेर यांनी कोणाचंही नाव न घेता पोस्ट शेअर करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अनुपम खेर?

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले होते, “राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीचा मुद्दा हा खूप छोटा विषय आहे. इतिहासात मंदिरांचा विध्वंस, लूटमार, तसंच हिंदूंवर झालेले अत्याचार हे त्याहून मोठे मुद्दे आहेत. जेव्हा मुघलांनी आपली मंदिरं तोडली होती, जेव्हा ब्राह्मणांची हत्या करण्यात आली होती, जेव्हा मंदिरांमधील धन लुटण्यात आलं होतं, महिलांवर अत्याचार झाले होते, या सर्वांत मोठ्या घटना होत्या. जर आपण त्या वेदनेतून पुढे येऊ शकतो, तर त्या तुलनेत ही खूपच छोटी गोष्ट आहे.” त्यांच्या याच वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी टीका केली.

अनुपम खेर यांची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

आता ट्रोलिंग होत असतानाच अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘प्रामाणिक व्यक्तीची सर्वांत मोठी संपत्ती म्हणजे त्याची निर्भयता. ज्याच्या मनात चोर नसतो, तो कधीही मान झुकवत नाही.’ इतकंच नाही तर त्यानंतर अनुपम खेर यांनी आणखी एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटलंय, ‘लोकप्रिय असणं चांगलं वाटतं. पण प्रत्येकाचं आवडतं बनण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा स्वत:पासून दूर जातो. स्वत:च्या नजरेत एक चांगला माणूस म्हणून राहणं ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, हे मी शिकलोय. बाकीच्या जगाची मतं काळानुसार बदलतात. तुमच्या जगात खरोखर किती लोकं महत्त्वाची आहेत? कधीतरी याचा विचार करा. संपूर्ण जगात लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करू नका. ते गरजेचंही नाही आणि योग्यही नाही.’

टीकाकारांना उत्तर-

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलं नाही, पण सोशल मीडियावरील टीकाकारांना त्यांनी याद्वारे प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनुपम खेर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचं खुलेपणाने समर्थन करताना दिसतात. मात्र राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक