AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये डांबून माझा प्रचंड छळ, ‘बिग बॉस 17’च्या स्पर्धकाचा थेट निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल..

बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र, अजूनही बिग बॉस 17 ला टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर नुकताच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. या आरोपांनंतर चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

हॉटेलमध्ये डांबून माझा प्रचंड छळ, 'बिग बॉस 17'च्या स्पर्धकाचा थेट निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल..
| Updated on: Jan 06, 2024 | 5:02 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 तूफान चर्चेत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. मात्र, नुकताच आता बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. यावेळी चाहत्यांकडून नाही तर बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडलेल्या एका स्पर्धकाने हे आरोप केले आहेत. या स्पर्धकाचे आरोप ऐकून लोक देखील हैराण झाले असून मोठी खळबळ निर्माण झालीये. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांवर अनुराग डोभाल याने गंभीर आरोप केले. अनुराग डोभाल हा बिग बॉस 17 च्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसला.

अनुराग डोभाल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बिग बॉस 17 च्या घरातील सदस्यांनी निर्णय घेत अनुराग डोभाल याला बाहेरचा रस्ता दाखवला. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये एक संताप हा बघायला मिळाला. आता नुकताच अनुराग डोभाल याने त्याच्या ब्लाॅगमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत.

अनुराग डोभाल याने सांगितले की, कशाप्रकारे बिग बॉस 17 च्या निर्मात्यांकडून त्याला त्रास देण्यात आला. बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तब्बल दोन दिवस त्याला हाॅटेलच्या रूममध्ये ठेवण्यात आले. यावेळी त्याचा छळ करण्यात आला. हेच नाही तर त्याचा संपर्क त्याच्या कुटुंबियांसोबत देखील होऊ दिला नाही. बाहेर नेमके काय सुरू आहे हे देखील त्याला कळू देत नव्हते.

अनुराग डोभाल हा म्हणाला की, मला दोन दिवस हाॅटेलच्या रूमममध्ये डांबून ठेवण्यात आले. यावेळी माझ्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार सतत येत होता. देवाचे आर्शिवाद असल्याने मी ते पाऊल उचलले नाही. माझ्या डोक्यात फक्त हेच सुरू होते की, बाहेर नेमके काय सुरू आहे. मात्र, निर्माते हे मला कोणासोबतच संपर्क होऊ देत नव्हते.

मी शोमधून बाहेर आलो, परंतू मला कोणासोबतच संपर्क करता आला नाही. मी शोमधून बाहेर आल्यानंतरही मला बिग बाॅस 17 च्या निर्मात्यांकडून टॉर्चर करण्यात आले. मुळात म्हणजे मी अशा ठिकाणाहून आलो, तिथे बाहेरच्या जगापासून मी अगोदरच दूर होतो आणि त्यामध्येच मला परत अशाप्रकारे ठेवण्यात आले. आता अनुराग डोभाल याचा हा खुलासा ऐकून अनेकजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना