‘मुलं जन्माला घालण्यासाठी…’, बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार तिसरं लग्न? दुसरी पत्नी आहे अभिनेत्री

Bollywood | मुलीची मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार तिसरं लग्न; म्हणाला, 'मुलं जन्माला घालण्यासाठी...', दिग्दर्शकाची दुसरी पत्नी आहे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिग्दर्शकाच्या वक्तव्याची चर्चा...

'मुलं जन्माला घालण्यासाठी...', बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार तिसरं लग्न? दुसरी पत्नी आहे अभिनेत्री
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 10:24 AM

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी एक दोन नाहीतर, तीन चार लग्न देखील केली आहे. आता देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा चर्चा रंगली आहे. सध्या ज्या दिग्दर्शकाच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे तो दुसरा तिसरा कोणी नाहीतर, दिग्दर्शक अनुराग कश्यप आहे. अनुराग कश्यप याचं दोन वेळा लग्न झालं आहे. पण अनुराग याचे दोन्ही लग्न अपयशी ठरले. अनुराग कश्यप याला पहिल्या लग्नापासून एक मुलगी देखील आहे. त्याच्या मुलीचं नाव आलिया असं आहे. आलिया हिच्या पॉडकास्ट Young Dumb and Axious शोमध्ये अनुराग याने तिसरं लग्न आणि रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

लेकीच्या पॉडकास्ट शोमध्ये अनुराग कश्यप याने स्वतःबद्दल एका गोष्टीचा खुलासा केला आहे. ‘मी रिलेशनशिप पर्सन नाही. म्हणून मी माझ्या सिनेमांना मानतो…’ असं दिग्दर्शक म्हणाला. ‘मी रिलेशनशिप पर्सन नाही याच कारणामुळे सिनेमासाठी माझं ऑब्सेशन, काम आणि ज्या प्रकारचे मी सिनेमे दिग्दर्शित करतो… त्या मागचं कारण माझे रिलेशनशिप आहेत…’

‘माझे रिलेशनशिप्स चांगल्या मार्गावर असते जर माझा जन्म युरोप याठिकाणी झाला असता. कारण त्याठिकाणी रॉयल्टी सिस्टम आहे. कारण पैसा येत राहतो. पण येथे भारतात अशी सिस्टम नाही. याच कारणामुळे जे पाच वर्षात एक सिनेमा बनवतात किंवा मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करतात, त्यांच्या तुलनेत मला अधिक सिनेमांचं दिग्दर्शन करावं लागतं…’ असं देखील अनुराग कश्यप म्हणाला.

हे सुद्धा वाचा

शोमध्ये अनुराग याच्या मुलीने वडिलांना तिसऱ्या लग्नाबद्दल विचारलं. यावर अनुराग म्हणाला, ‘मला नाही वाटत की, मी कधी तिसरं लग्न करेल.’ आलिया म्हणाली, ‘जेव्हापासून मी लहान होती, नेहमी एकटी राहिली आहे. मला वाटतं आई आणि तुमचा घटस्फोट झाला आहे. आता तुम्ही वेगळ्या पार्टनरला डेट कराल. ज्यामुळे मला एका भाऊ किंवा बहीण भेटली असती…’

लेक आलिया हिने व्यक्त केलेल्या इच्छेवर अनुराग कश्यप म्हणाला, ‘तुझे वडील आता एका बाळाचे वडील होण्यासाठी वृद्ध झाले आहेत…’ असं देखील आलिया म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया आणि अनुराग यांची चर्चा रंगली आहे.

अनुराग कश्यप याचं पहिल लग्न आरती बजाज हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर अनुराग याने दुसरं लग्न अभिनेत्री कल्की केक्ला हिच्यासोबत केलं. अनुराग याचं दुसरं लग्न देखील अपयशी ठरलं… कल्की तिच्या आयुष्यात आनंदी आहे. अभिनेत्री कायम तिच्या मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.