‘छावा’मुळे फूट पडली, तर काम का केलं…? ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट, दिग्दर्शकाची स्पष्ट भूमिका

A. R. Rahman on Chhaava : 'छावा' हा फूट पाडणारा सिनेमा होता, तर काम का केलं? ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यानंतर सेलिब्रिटींसह प्रेक्षकांचा संताप... आधीच दिग्दर्शकाने स्पष्ट केलेली भूमिका...

छावामुळे फूट पडली, तर काम का केलं...? ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट, दिग्दर्शकाची स्पष्ट भूमिका
A R Rahman
| Updated on: Jan 19, 2026 | 11:34 AM

A. R. Rahman on Chhaava : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाबद्दल काही सांगायलाच नको. 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर सिनेमाने बक्कळ कमाई केली आणि संपूर्ण जगासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास ठेवला. 2025 मधील ‘छावा’ सिनेमा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला. आजही सिनेमा चर्चेत आला आहे. पण कारण वादग्रस्त आहे. संगीतकार ए. आर. रेहमान यांनी ‘छावा’ सिनेमा हा फूट पाडणारा सिनेमा आहे… असं वक्तव्य केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील त्यांच्या वक्तव्यानंतर नाराजी उपस्थित केली आहे.

‘छावा’ सिनेमावर रेहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य

यांनी ‘छावा’ सिनेमा हा फूट पाडणारा सिनेमा आहे… रेहमान यांचं हे वक्तव्य अनेकांना आवडलेलं नाही. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची वीर गाथा पडद्यावर आणली. अशात अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहे. जर संगीतकाराला सिनेमा आवडलाच नव्हता तर, सिनेमाला स्वतःचं संगीत का दिलं?

‘छावा’ सिनेमासाठी ए. आर. रेहमान यांची निवड का करण्यात आली. याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट उत्तर आधीच दिलं होतं. ‘छावा’ सिनेमाला मराठी टच यावा अशी माझी इच्छा नव्हती. असं असतं तर, मी सिनेमाच मराठी भाषेत तयार केला असता… हिंदी भाषेत सिनेमा तयार करण्यात आला कारण मला सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. असं दिग्दर्शक म्हणाले होते.

‘छावा’ सिनेमासाठी रेहमान यांची निवड का केली?

रेहमान यांच्या निवडीवर लक्ष्मण उतेकर म्हणाले, ‘हॉलिवूड सिनेमांकडे पाहून मला छत्रपती संभाजी महाराजांची कथा मोठ्या पडद्यावर मांडायची होती. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन बाळगण्याच्या उद्देशाने त्यांनी हा सिनेमा बनवला, ज्यासाठी त्यांनी संगीतासाठी ए.आर. रहमान यांची निवड केली. पुढे रेहमान म्हणाले, ‘माझं स्वप्न आहे की, अजय – अतुल यांसारख्या दमदार संगीतकारांसोबत काम करु… मला त्यांची कला प्रचंड आवडते. पण ‘छावा’ सिनेमासोबत मला अशा काही गोष्टी करायच्या होत्या, ज्या संपूर्ण जगाला आवडतील… महाराष्ट्रात सर्वांना महाराजांबद्दल माहिती आहे. पण महाराष्ट्राबाहेर फार कमी लोकांना माहिती आहे… त्यामुळे ए.आर रेहमान यांची निवड केली…’ असं देखील उतेकर म्हणाले होते.

‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने जगभरात 800 कोटींचा व्यवसाय केला. यामध्ये विकी आणि रश्मिका यांनी दमदार भूमिका सारारली आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना भाव खाऊन गेला.